Wednesday, 30 January 2019

*जिल्हा परिषद प्रशाला माडज याठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे वर्चस्व.*











🌷🥇🌷🥇🌷🥇🌷

*जिल्हा परिषद प्रशाला माडज याठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे वर्चस्व.*

*दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी माडज येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत आमच्या मलंग विद्यालयातील कुमारी कलापे दमयंती सुभाष इयत्ता आठवी (सेमी) या विद्यार्थिनीने तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.*
    *याच ठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेमध्ये आमच्या मलंग विद्यालयाच्या संघाने तालुक्यातून सर्व द्वितीय क्रमांक पटकाविला म्हणून  कुमारी कलापे दमयंती सुभाष  आणि  वाद विवाद संघातील विद्यार्थी चिरंजीव शिंदे रितेश महादेव व कुमारी मंडले गायत्री राजेंद्र इयत्ता आठवी (सेमी) या विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री आर. बी. जाधव सर यांचा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.*

🌷🏆🌷🏆🌷🏆🌷

Friday, 25 January 2019

प्रजासत्ताक दिन -2019



















🌹 *कै.शरणप्पा मलंग वि.उमरगा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न* 🌹 

आज दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी आमच्या मलंग  विद्यालयांमध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपसचिव श्री एस के व्हंडरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
याप्रसंगी श्री एस के मलंग अध्यक्ष शालेय शिक्षण समिती शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा, वि के पाटील ज्येष्ठ सदस्य वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा,श्री आप्पासाहेब हत्ते सदस्य, श्री संतोष करपे सदस्य, श्री शिवराज बमचंडे सदस्य,मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्याच्या नंतर  स शि परमेश्वर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परेड रूपातून ध्वजाला मानवंदना दिली.मान्यवरांच्या स्वागतानंतर राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्डसाठी निवड झालेली विद्यार्थिनी कुमारी भक्ती शिवाजी शिंदे आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक श्री विवेकानंद पाचंगे यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.तसेच भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003  नुसार  महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्यासाठी  सहशिक्षक  श्री  परमेश्वर सुतार  यांनी सर्व विद्यार्थ्यां कडून तंबाखूविरोधी शपथ म्हणून घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स शि श्रीमती मीनाक्षी हत्ते यांनी केले तर आभार स शि श्री बालाजी हिप्परगे  यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून  करण्यात आली.

🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

मलंग विद्यालयाची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इनस्पायर अवॉर्ड साठी निवड


🌹🌹🌷🌷🌹🌹

*मलंग विद्यालयाची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इनस्पायर अवॉर्ड साठी निवड* 

दि.23 जाने.2019 ते 25 जाने.2019 या कालावधीत *स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय इनस्पायर अवॉर्ड मधून आमच्या मलंग विद्यालयाची राज्यस्तरीय इनस्पायर अवॉर्ड साठी निवड झाली* 

विद्यालयातील विद्यार्थिनी *कु.भक्ती शिवाजी शिंदे*
*हिने मानवी शक्तीवर चालणारे वाशिंग मशीन*
या उपकरणाचे सादरीकरण करून यश संपादन केले,
याबद्दल तिला आणि मार्गदर्शक शिक्षक
*श्री विवेकानंद पाचंगे सर*
यांना मलंग विद्यालयाचे *मुख्याध्यापक अजित गोबारे सर,संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम.एस.मलंग साहेब आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विज्ञान शिक्षक परमेश्वर सुतार,स.शि. जाधव सर,मुळे सर,कटके सर,हिप्परगे सर,कोळी सर,पाटील सर,बिराजदार मॅडम,हत्ते मॅडम यांनी शुभेच्छा प्रदान केल्या*.

🌹🌹🌷🌷🌹🌹







*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*

*25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन* यानिमित्त मतदार जनजागृतीसाठी विद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आज दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी *छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा* या ठिकाणी, सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले  विद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन

🌹🌹🌷🌷🌹🌹

Thursday, 24 January 2019







🌷🌷🌹🌹🌷🌷

 *कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*

*आमच्या  विद्यालयामध्ये*
*आज दि.25 /01 /2019 राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त  विद्यालयातील विद्यार्थ्यांची उमरगा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली व मतदार दिन साजरा करण्यात आला.*

🌷🌷🌷🌷🌷🌷

Monday, 21 January 2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा. 2018-19








कै. शरणप्पा मलंग विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा.
उमरगा आज दि. 22/01/2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
  स्वंयशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कु. वैशाली धनराज हेबळे तर उपमुख्याध्यापीका कु. वैशाली यादव वाघुले त्यांनी दिवसभर शाळेची प्रशासकीय जबाबदारी पार पाडली.
  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव यावा म्हणून शालेय उपक्रमाअंतर्गत स्वयंशासन दिनाला अतिशय महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह वाढावा व अध्यापनाचा अनुभव मिळावा म्हणून कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांच्या पुढाकाराने विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न झाला.
   यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेमध्ये व त्या-त्या विषयाचे उत्कृष्टपणे अध्यापन केले.


Saturday, 19 January 2019



🌷✌🌷✌🌷✌🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे N.M.M.S. परीक्षेत घवघवीत यश.*

*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती परीक्षा 2018-19 मध्ये आमच्या विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील एकूण 21 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी  14 विद्यार्थी या परीक्षेत यश संपादन केले. ही परीक्षा  इयत्ता आठवी वर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये  प्रविष्ट होता येते. ही परीक्षा शैक्षणिक-दृष्ट्या स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज जीवना पर्यंत शासनाकडून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. या परीक्षेत आमच्या विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.*

*1)प्रथम - मंडले गायत्री राजेंद्र गुण - 111*
*2)द्वितीय - बिराजदार शिवानी उदय   गुण 97*
*3) तृतीय - शिंदे रितेश महादेव*
  *गुण - 93*
*4) बिराजदार धीरज राम*
*5) हिराळे निखिल बालाजी*
*6) भोसले प्रणाली अरविंद*
*7)वजन प्रथम उत्कर्ष*
*8)स्वामी रतनकुमार पंचय्या*
*9)आगलावे शुभम इराप्पा*
*10) घोडके स्वाती बिरु*
*11)हळदे वैष्णवी देवीदास*
*12)कोतले विठ्ठल विजय*
*13) कडगंचे श्रद्धा श्रीशैल्य*
*14) बिराजदार श्रुती पंढरीनाथ*

*या विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 11 January 2019






🌷🚩🌷🚩🌷🚩🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा*
*कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा*

*आज दि. 12 जानेवारी 2019 वार शनिवार रोजी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि युगपुरुष  स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न.* 
    
*विद्यालयांमध्ये  माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.* *प्रथमता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजित गोबारे सर मुख्याध्यापक मलंग विद्यालय आणि प्रमुख पाहुणे श्री कविराज रेड्डी सर मुख्याध्यापक कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा यांच्या हस्ते करण्यात आले.* 

*विद्यालयातील सहशिक्षक श्री परमेश्वर सुतार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला, राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष विवेकानंद यांचे सर्व गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जीवन यशस्वी करावे असे मार्गदर्शन केले.*

*तसेच युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या जन्मदिनी कटिबद्ध व्हावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.*

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी करून आभार मानले.*

🌷🌹🌷🌹🌷🌹🌷