विठ्ठल नामाची शाळा भरली
कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचा खास उपक्रम
आषाढी कार्तिकीचे औचित्य साधून शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये दि. 11/07/2019 वार गुरुवार रोजी खास दिंडीचे आयोजन करण्यात आले. निमित्त पंढरपूरची आषाढी एकादशी. महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पायी चालत पंढरपूरमध्ये पोहोचल्या असता त्याची अनुभुती विद्यार्थ्यांना यावी व वृक्षारोपणाचे आणि दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून या खास दिंडीचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
यामध्ये खास आकर्षण म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये संकेत राजेंद्र दूधभाते आणि समृद्धी जयराज पटवारी यांनी तर वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला.
महादेव मंदिरापासून ते इंदीरा चौक, शिवाजी चौक, आणि जुन्या पेठेतून शरणप्पा मलंग विद्यालयमध्ये या दिंडीने प्रस्थान केले. झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता ज्याच्या घरी आरोग्य तेथे वास करी, पर्यावरणाचे रक्षण हेच खरे शिक्षण असा संदेश समाजाला दिला .
ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत भक्तीच्या नादात आणि टाळ-मृदुंगाच्या तालात विद्यार्थ्यांनी पाऊल धरला.
महिला वारकऱ्याच्या वेशामध्ये नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या मुली या दिंडीचे खास आकर्षण ठरल्या तर दिंडी मध्ये फुगड्या खेळणाऱ्या मुली आणि पाऊल धरणारे विद्यार्थी यामुळे उमरगेकर अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले.
विठ्ठल रुक्माई बरोबरच वारकरी ,नेते ,समाजसेवक आणि संतांच्या भूमिकेत विद्यार्थी दिंडी मध्ये सहभागी झाले. त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सुरेखाताई मलंग यांच्या हस्ते विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे नूतन सचिव प्रा. युसुफ मुल्ला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. किरण सगर, अधिव्याख्याता चात्रे मॅडम,शरणप्पा मलंग विद्यालय चे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी ह.ब.प. रितेश महादेव शिंदे महाराज इयत्ता नववी वर्गातील या विद्यार्थ्यांचे विठ्ठल नामाची शाळा भरली या विषयावरती अतिशय सुंदर असे कीर्तन केले. विद्यार्थ्यांनी या वारीतून आईवडिलांची सेवा गुरुजनांचे आदर व समाजाची प्रगती लक्षात घेऊन वारी आपल्या जीवनात उतरवावी व राष्ट्रीय एकात्मता साधावी असे मार्गदर्शन केले.
ही वृक्षदिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचा मृदंगाचार्य विद्यार्थी अष्टविनायक जोगी सर्व शिक्षक वृंद राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर सुतार, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, जयदीप पाटील, मोहन साखरे, दूषंत कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.