🌷🚩🌷🚩🌷🚩🌷
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा*
*कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा*
*आज दि. 12 जानेवारी 2019 वार शनिवार रोजी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न.*
*विद्यालयांमध्ये माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.* *प्रथमता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजित गोबारे सर मुख्याध्यापक मलंग विद्यालय आणि प्रमुख पाहुणे श्री कविराज रेड्डी सर मुख्याध्यापक कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा यांच्या हस्ते करण्यात आले.*
*विद्यालयातील सहशिक्षक श्री परमेश्वर सुतार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला, राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष विवेकानंद यांचे सर्व गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जीवन यशस्वी करावे असे मार्गदर्शन केले.*
*तसेच युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या जन्मदिनी कटिबद्ध व्हावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी करून आभार मानले.*
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷