Friday, 14 August 2020

शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा - 2020









 👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳



शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा.


    *प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा येथील प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला पण कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या वर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री आप्पासाहेब हत्ते मामा उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मलंग विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी  मलंग विद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन सहभाग नोंदविला व त्याप्रमाणे इयत्ता दहावी ब ची विद्यार्थिनी उमा पुजारी, विश्रांती जमादर,मनीषा ब्याळे या विद्यार्थिनींनी शाळेच्या गणवेषामध्ये झेंडा गीत सादर केले असंख्य विद्यार्थ्यांनी एक सूर एक ताल देशभक्तीपर समूह गीत सादर केले तर प्रतिवर्षाप्रमाणे क्रांतिकारकांच्या वेशभूषेमध्ये ऑनलाइन उपस्थित होते.*

    *यावेळी मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्काऊट ध्वजास मानवंदना दिली. दोन्ही शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद घेतला तर स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या 12 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यात क्रांतीकारकांचे योगदान या विषयावरती मलंग विद्यालयातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला या स्पर्धेचा निकाल परीक्षक श्री परमेश्वर सुतार सर यांनी ऑनलाईन जाहीर केला यामध्ये सर्वप्रथम मंडले गायत्री राजेंद्र तर द्वितीय शिंदे रितेश महादेव तृतीय बिराजदार शिवानी उदय उत्तेजनार्थ शिंदे प्रार्थना माधव यांनी पारितोषिक पटकाविले. या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.*

  *या कार्यक्रमाचे ऑनलाइन सूत्रसंचालन श्रीमती मीनाक्षी जाधव मॅडम यांनी केले तर आभार श्रीब्रह्मानंद गायकवाड यांनी मांडले.*

  *स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे नियोजन तंत्रस्नेही शिक्षक श्री परमेश्वर कोळी यांनी केले.*


🌹🇮🇳👩‍💻👨‍💻🌹🇮🇳👩‍💻👨‍💻🌹