Monday, 15 April 2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यानुभव कृतीमधून नवनिर्मिती

कै. शरणप्पा मलंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यानुभव कृतीमधून नवनिर्मिती

उमरगा दि.15 कृतीशिक्षण हे आज काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन कै. शरणाप्पा मलंग विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कार्य शिक्षणामधून ही जीवनाची प्रगती करता येते व नवनिर्मिती करता येते हे विविध प्रकारचे टाकाऊ पासून टिकाऊ व कागदी  आकाशकंदील, स्टोअर बॉक्स, पक्षी, प्राणी, काड्यापासुन शोभेच्या वस्तू, घरे, रेशमी दोऱ्याचे पाकीट, मोत्यांची माळ, फोटो फ्रेम, आइस्क्रीमच्या काड्या पासून खेळाचे साहित्य इत्यादी अनेक कलाकृती बनवून कार्यानुभव शिक्षण हे काळाची गरज आहे हे दाखवून दिले आहे. शिक्षण म्हणजे नाविन्याचा शोध आणि त्यापासून समाजाने घ्यावयाचा असतो. विद्यार्थी हे केवळ पुस्तकी ज्ञान न घेता स्वतःच्या संकल्पनेतून निर्मिती केली पाहिजे व ती नवनिर्मिती समाजाच्या उपयोगाची असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रतिकृती मधून दाखवून दिले आहे शिक्षणाला कृतीची जोड देऊन त्याला आपला छंद जोपासला पाहिजे. केवळ शिक्षण आनंददायी होत नाही तर समाजाच्या प्रगतीचा एक भाग बनतो. हेच या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या  कृतीतून दिसून येते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांनी केले असून विद्यार्थ्यांनी या नवनिर्मिती वर अतिशय मनापासून प्रोत्साहन दिले आहे.
शाळेतील सर्व शिक्षकानी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
 राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर सुतार,  परमेश्वर कोळी, सौ. प्रभावती बिराजदार, सौ. मीनाक्षी हत्ते या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.