🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
📚📖📚📖📚📖📚📖
➖➖➖➖➖➖➖➖
*कै. शरणप्पा मलंग विद्यालया मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.*
*आज दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी भारताचे मिसाइल मॅन माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मलंग विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न.*
*प्रथमता डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री अजित गोबारे व प्रमुख पाहुणे कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे ज्येष्ठ सहशिक्षक सुभाष कलापे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स.शि.परमेश्वर सुतार हे उपस्थित होते.*
*स्वप्न म्हणजे ते नव्हे जे तुम्ही झोपल्यानंतर पाहता स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही या विचाराने सर्व विद्यार्थ्यांना तरुणांना भविष्यातील भारत घडवण्याचे आव्हान करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील एक थोर शास्त्रज्ञ त्यासोबतच भारताचे माजी राष्ट्रपती होते "अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे" याप्रमाणे आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी उच्च ध्येयाची निश्चिती करून ते साध्य केले असे मत श्री सुतार यांनी व्यक्त केले.*
*मोठा भाऊ दुकान चालवत असताना छोटा भाऊ शिंपले विकत असताना आणि वडील नावाडी चालवत असताना सुद्धा आपल्या शिक्षणातील अडचणी बाजूला सारून,घरातील सर्वांच्या मदतीने त्यावर मात करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.*
*तसेच ते एक संवेदनशील व्यक्ती होते रुद्रवीना वाजविणे,मुलांशी गप्पा मारणे हे त्यांचे छंद होते.आपण सर्वांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून अनमोल असे विचार घ्यावेत आणि त्याचे अंगीकरण करून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी,त्यांनी लिहिलेले पुस्तके विंग्ज ऑफ फायर इंडिया, माय ड्रीम इग्नायटेड माईंड अशी पुस्तके आपण वाचून घ्यावेत, विविध पुस्तके वाचत राहावे तेव्हाच खऱ्या अर्थाने आजचा वाचन प्रेरणा दिन सार्थकी लागेल असे श्री परमेश्वर सुतार सर म्हणाले शेवटी विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगितलेला हा विचार कायमचा लक्षात ठेवावा की "टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट यु ह्याव टू बर्न लाईक सन"असे ते म्हणाले.*
*या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे, दुशंत कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री अगतराव मुळे सर यांनी केले व शेवटी आभार मानले.*
💐💐💐💐💐💐💐💐
📖📚📖📚📖📚📖📚