Sunday, 12 June 2022

आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी रॅलीमध्ये शरणप्पा मलंग विद्यालयाचा सक्रिय सहभाग


 👨🏼‍⚖️🧔‍♀👱‍♂️👩‍⚖️🧔‍♀👱‍♂️👨🏼‍⚖️🧔‍♀👱‍♂️👩‍⚖️🧔‍♀


*आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी रॅलीमध्ये शरणप्पा मलंग विद्यालयाचा सक्रिय सहभाग*


   *उमरगा दि. 12/06/2022 वार रविवार रोजी तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बालकामगार विरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये व कायदेविषयक शिबिरामध्ये शरणप्पा मलंग विद्यालयाचा सक्रिय सहभाग नोंदविल्या आला त्या निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शरणप्पा मलंग विद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी शाळेच्या गणवेश्यामध्ये उपस्थित होते तर शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा व कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांनी रॅली व कायदेविषयक शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला.*

   *सर्वप्रथम शरणप्पा मलंग विद्यालयाच्या व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक घेऊन "बालमजुरी हटवा, बालमजुरी मिटवा" अशा जोरदार घोषणा देत शाळेपासून हुतात्मा स्मारक ते न्यायालय परिसरापर्यंत भव्य अशी रॅली काढली या रॅलीमध्ये सन्मानीय न्यायाधीश सर्व सन्माननीय वकील इतर शाळेचे शिक्षक वृंद एन.सी.सी. विद्यार्थी, स्काऊट गाईड विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.*

   *नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री डी. के. अनुभुले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश उमरगा, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मनीषा चराटे दिवाणी न्यायाधीश, सौ. एस. ए. कानशिडे मॅडम सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर उमरगा, सौ.एस. एच. राठी सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर उमरगा, कु. एम. पी. मथुरे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर उमरगा, एडवोकेट श्री प्रवीणचंद तोतला, एडवोकेट श्री जी. के. गायकवाड, एडवोकेट श्री व्हि. एस. आळंगे, एडवोकेट श्रीमती एस. ए. पोतदार,एडवोकेट एस. एस. राजेश्वरकर, शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर, भारत विद्यालय उमरगा व्यंकट गुंजोटे सर, आदर्श विद्यालय उमरगा शिवराज औसेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.*

     *कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट श्री व्हि. एस. आळंगे यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एडवोकेट श्रीमती एस.एस. सुरवसे यांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा कायदा 2009 या विषयावर मार्गदर्शन केले तर एडवोकेट श्री अक्षय प्रवीणचंद तोतला यांनी अन्नसुरक्षा कायदा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना आपले शरीर एक बँक असून त्यामध्ये जशा प्रकारचे अन्न तुम्ही घालाल त्या प्रकारचे आयुष्याचा परतावा तुम्हाला देते. अध्यक्षीय समारोप करीत असताना जिल्हा सत्र न्यायाधीश श्री डी. के. अनभुले म्हणाले की, बालमजुरी ही आंतरराष्ट्रीय समस्या असून केवळ मुलांना दोषी धरता येत नाही तर पालक, शिक्षक व समाजातील उच्चशिक्षित लोकांनी बालमजुरी विषयी पालकांना व मुलांना समुपदेशन केले पाहिजे व कायद्याच्या रक्षकांनी वेळोवेळी समज दिले त्यावर लक्ष ठेवले तर ही बालमजुरी कमी होण्यास निश्चितच मदत मिळेल एक दिवस रॅली काढून हा प्रश्न मिटणार नाही तर अशा बाल मजुरांकडून काम करून घेणाऱ्या व्यक्तींचे मन परिवर्तन करून हे समस्या सोडविली पाहिजे असे ते म्हणाले.*

    *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आभार एडवोकेट श्री एस.पी. इनामदार सचिव विधिज्ञ मंडळ उमरगा यांनी केले.*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐