Monday, 1 April 2019


राज्यपाल पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन

आज दि. 01/04/2019 रोजी कै. शरणप्पा विद्यालयातील स्काऊट-गाईड राज्यपाल पुरस्कार परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्काऊट गाईड कार्यालय उस्मानाबाद या ठिकाणी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी राज्यपाल पुरस्कारासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये मलंग विद्यालयातील एकुण बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि विद्यालयातील या बारा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकाल लावला. म्हणजेच राज्यपाल पुरस्कारासाठी बारा विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. याबद्दल शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस. के.मलंग, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्हि. के. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि यांचे मार्गदर्शक शिक्षक परमेश्वर कोळी यांचे अभिनंदन करण्यात आले.