Monday, 1 October 2018

कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती व पालक मेळाव्याचे आयोजन
उमरगा दि. 02/10/2018 कै. शरणप्पा मलंग विद्यायलयामध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर  शास्त्री जयंती पालक मेळाव्याचे आयोजन करून साजरी करण्यात आली. महात्मा गांधीजी यांची शिकवण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही आत्मसात करावी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून या जयंतीला विद्यार्थ्यांच्या पालकांना ही निमंत्रित करण्यात आले होते. या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र चाचणी परीक्षेचा निकाल देण्यात आला व इयत्ता आठवी, नववी,दहावी मराठी व सेमी माध्यमातुन प्रथम, द्वितीय,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच गोळा फेक या खेळ प्रकारांमध्ये विभागावर निवड झालेल्या  शोएब इनामदार तसेच धनुर्विद्या खेळ प्रकारांमध्ये विभाग स्तरावर निवड झालेल्या कु. आर्या वाले व कु. मोहिनी स्वामी या खेळाडूचा व त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त श्री बालाजी हिपरगे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले तर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री अजित गोबारे सर यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वाढत्या स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन पाल्याच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस.के.मलंग तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श पालक श्री दिलीप जवळगे व प्रमुख पाहुण्यामध्ये शाळेचे सदस्य श्री अप्पु हत्ते व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर आचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले विवेकानंद पाचंगे सर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.