Wednesday, 30 January 2019

*जिल्हा परिषद प्रशाला माडज याठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे वर्चस्व.*











🌷🥇🌷🥇🌷🥇🌷

*जिल्हा परिषद प्रशाला माडज याठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे वर्चस्व.*

*दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी माडज येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत आमच्या मलंग विद्यालयातील कुमारी कलापे दमयंती सुभाष इयत्ता आठवी (सेमी) या विद्यार्थिनीने तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.*
    *याच ठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेमध्ये आमच्या मलंग विद्यालयाच्या संघाने तालुक्यातून सर्व द्वितीय क्रमांक पटकाविला म्हणून  कुमारी कलापे दमयंती सुभाष  आणि  वाद विवाद संघातील विद्यार्थी चिरंजीव शिंदे रितेश महादेव व कुमारी मंडले गायत्री राजेंद्र इयत्ता आठवी (सेमी) या विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री आर. बी. जाधव सर यांचा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.*

🌷🏆🌷🏆🌷🏆🌷