शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये साने गुरुजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
दि.:-24/12/2021 वार शुक्रवार आज शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारस्वामी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शरणप्पा मलंग विद्यालयातील जेष्ठ शिक्षक इंग्रजी विभागप्रमुख श्री राजकुमार जाधव हे उपस्थित होते.*
*सर्वप्रथम कार्यसम्राट शरणप्पा मलंग अप्पा यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या शुभहस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.*
*याप्रसंगी शरणप्पा मलंग विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी चि. यश युवराज लोहार व चि. संदेश सिद्धय्या स्वामी या विद्यार्थ्यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर गोष्टी स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली.*
*विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विज्ञान शिक्षक श्री परमेश्वर सुतार सर म्हणाले की, "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" हा सुंदर संदेश पूर्ण जगाला देणारे आणि प्रत्येकाच्या हृदयाला प्रेमाचा पाझर फोडणारे थोर साहित्यिक, कवी, एक शिक्षक सानेगुरुजी हे आजच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना सुसंस्कृत होण्यासाठी एक आदर्श आहेत.*
*साने गुरुजी यांचे जीवन घडविण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या म्हणजे त्यांच्या आई यशोदाबाई, त्यांनी लहानपणापासूनच साने गुरुजी वरती अतिशय अनमोल संस्कार केले आणि त्यातूनच सानेगुरुजी यांच्या जीवनाला आकार मिळाला.*
*साने गुरुजीच्या आईंनी साने गुरुजी यांना सांगितले की, जसे पायाचे तळवे घाण होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो तसेच आपले मन मलिन होऊ नये म्हणून आपण काळजी घेणे गरजेचे आहे आणि या संस्कारानेच निर्मळ आणि प्रेमळ मनाचे सानेगुरुजी तयार झाले. साने गुरुजींनी रचलेली,आज महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये पोचलेली सुंदर रचना म्हणजे "श्यामची आई" हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी वाचलेच पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सानेगुरुजी यांना अभिवादन केल्यासारखे होईल असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यासोबतच ते म्हणाले की साने गुरुजी यांनी म्हटल्याप्रमाणे "करी मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभूशी तयाचे" अशा मुलांना घडवण्याची संधी आम्हाला मिळते म्हणून आम्ही शिक्षक खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत.*
*या कार्यक्रमासाठी शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री अगतराव मुळे, श्री सतीश कटके, श्री परमेश्वर कोळी, श्रीमती प्रभावती बिराजदार, श्रीमती मीनाक्षी हत्ते, कर्मचारी श्री कलशेट्टी पाटील, श्री मोहन साखरे, श्री दुष्यंत कांबळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी केले तर आभार श्री बालाजी हिपरगे यांनी मानले.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹