Monday, 2 September 2019

मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना 2019















मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

आज दिनांक 2 सप्टेंबर 2019 वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित, कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा आणि कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा या विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती ची स्थापना श्री व सौ मलंग यांच्या हस्ते करण्यात आली.

गणेशोत्सव म्हणजे एक प्रचंड उत्साह प्रचंड प्रसन्नता पण त्यामध्ये नकळतपणे निसर्गाची हानी होत असेल तर विचार करणे गरजेचे आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यासाठी विद्यालयांमध्ये कुठल्याही केमिकलचा वापर न करता  बनवलेली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब आणि वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ सुरेखा ताई मलंग यांच्या शुभहस्ते श्रीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
  तसेच विद्यालयातील जवळपास दोनशे ते अडीशे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपतीची निर्मिती केली आणि त्याच गणपतीची घरामध्ये स्थापना करण्याचे ठरविले.
आज मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या गणपती मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर जल प्रदूषण प्रदूषण होत असते तेव्हा या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे
गेल्या वर्षी म्हणजे 2018 पासून पर्यावरणपूरक गणपती स्थापना करण्याचा निश्चय विद्यालयाने केला आणि तोच निश्चय विद्यार्थ्यांमध्ये रुजविला.
आम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवून घरामध्ये याची स्थापना करत आहोत यामध्ये आम्हाला वेगळा आनंद मिळत आहे कारण यामुळे आम्हाला पर्यावरण संवर्धन यामध्ये सहभागी होता येत आहे असे मत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची पाहणी करताना वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम एस मलंग साहेब आणि सचिव सौ सुरेखाताई मलंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
   याप्रसंगी शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय उमरगा चे अध्यक्ष श्री एस. के. मलंग तसेच वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्ही. के. पाटील तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर आणि मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.