Monday, 6 August 2018

विद्यार्थ्यांचे यश

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*तालुकास्तरीय विज्ञान  वक्तृत्व, योगा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे यश*

राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर,गटशिक्षण कार्यालय उमरगा व कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान वकृत्व स्पर्धेचे आयोजन दि. 04/08/2018 वार शनिवार रोजी कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तथा अध्यक्ष शालेय शिक्षण समिती कै शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा चे *श्री एस. के. मलंग साहेब*, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक *श्री अजित गोबारे सर* उपस्थित होते.
औद्योगिक क्रांती: आपण तयार आहोत काय ? हा या स्पर्धेचा विषय असून या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी *चि. शिंदे रितेश महादेव* हा तालुक्यातून *सर्वप्रथम* आला असून जिल्हास्तरावर याची निवड झाली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आमच्या विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* यांनी प्रेरणा दिली असून या स्पर्धेसाठी विज्ञान शिक्षक *श्री व्हि.बी.पाचंगे सर* व *श्री पी. आर. सुतार सर* यांनी मार्गदर्शन केले. तसेच चालू असलेल्या पावसाळी क्रीडा योगा स्पर्धेमध्ये दिव्यता चंद्रास काजळे,समर्थ संजय कडुंबले व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दीक्षा दगडू आगलावे या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय निवड झाली. यशस्वीतेसाठी *श्री आर. बी. जाधव सर*, *श्री एल मुळे सर*, *श्री एस, एस, कटके,* *श्री बी आर हिप्परगे सर,*  *श्रीम. पी. एन. बिराजदार*, *श्रीम. एम. एस. हत्ते*  *श्री पी. आर. कोळी सर* यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
💐🎯💐🎯💐🎯💐