Tuesday, 30 April 2019

महाराष्ट्र दिन 2019
























कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

उमरगा दि. 01/05/2019 वार बुधवार रोजी प्रतिवर्षाप्रमाण कैे. शरणप्पा मलांग विद्यालया मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शरणप्पा मलंग विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री एम.एस. मलंग साहेब, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस. के  मलंग साहेब, मान्यवर सदस्य श्री अप्पासाहेब हत्ते, श्री संतोष करपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री कविराज रेड्डी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे इयत्ता पहिली ते नववी कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर व शरणप्पा मलंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना निकाल देऊन इयत्ता नववीतील गुणानुक्रमे व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा  प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणपत्रक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी ध्वजा वंदन केल्यानंतर इयत्ता नववीच्या मुलींनी महाराष्ट्र गौरव गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व श्री बालाजी हिप्परगे सर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी हिप्परगे सर यांनी केले तर आभार श्री परमेश्वर सुतार यांनी मानले. 
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मिनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, जयदीप पाटील, मोहन साखरे, दुशंत कांबळे व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे सर्व शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.