Wednesday, 2 January 2019

🌹🌹🌷🌷🌹🌹

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा*

*विद्यालयातील विध्यार्थी शोएब महेबूब इनामदार गोळा फेक खेळ प्रकारात विभागात सर्वप्रथम*

*स्वातंत्र्यसेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे (तुळजापूर) यांच्या ९९ व्या जयंती निमित्त मराठवाडा समन्वय समिती, पुणे आयोजित मराठवाडा विभागीय शालेय स्पर्धेत शोएब महेबूब इनामदार याने दि.३१/१२/२०१८ रोजी गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.*

*रुपये ५०००/-  रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.*
*शोएब महेबूब इनामदार व मार्गदर्शक शिक्षक श्री परमेश्वर कोळी सर यांचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.*

🌹🌹🌷🌷🌹🌹


🌹🌹🌷🌷🌹🌹

*तिसरे विध्यार्थी साहित्य संमेलन,जकेकुर*

*तिसरे साहित्य संमेलन 9 जानेवारी 2019*

निमित्य विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये 
*हस्तलिखित स्पर्धा* 
या स्पर्धेत 

*कै.शरणप्पा मलंग* विद्यालयाने *तृतीय क्रमांक* पटकाविला याबद्दल विद्यालयातील *मराठी विभाग प्रमुख श्री मुळे सर* यांचा विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री गोबारे सर* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.*

🌹🌹🌷🌷🌹🌹