Wednesday, 25 July 2018

कारगिल दिन 2018



🌹🌹🌷🌷🌹🌹

*दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायकांदो स्पर्धेत,*
*कु.श्रेया श्रीशैल व्हंडरे हिने रौप्यपदक पटकाविल्याबद्दल तिचा उमरगा येथे भव्य नागरी सत्कार.*

दक्षिण कोरिया मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय तायकांदो स्पर्धेमध्ये कु. श्रेया व्हंडरे हिने रौप्य पदक मिळवल्यामुळे उमरगा शहरात बुधवारी सकाळी राजेशाही थाटामध्ये तिचे स्वागत करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे तिचे आगमन होताच ,नगराध्यक्षा सौ. प्रेमलताताई टोपगे, नगरसेवक श्री एम. ओ. पाटील, नगरसेवक महेश माशाळकर, लिंगायत समाजाचे अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ मलंग साहेब, तसेच लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष वैजिनाथ अप्पा माशाळकर, ज्येष्ठ सदस्य शरणुकाका येळापूरे, प्रकाश वाकडे, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, धनप्पा अरबळे यांनी तसेच प्रदीप गिरीबा,बाळू परांडे, महादेव पाटील, राजीव अरबळे, तम्मा मामा माळगे, नागेश दंडगे, बसवराज चलगिरे, यांच्यासह आकाश दादा शिंदे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिचा सत्कार केला.
               उमरगा शहरातुन श्रेया हिने ऐतिहासिक कामगिरी करून उमरगा शहराचा झेंडा अटकेपार नेला आहे म्हणून श्रेया व्हंडरे हिची हुतात्मा स्मारकापासून ते शिवाजी चौक उमरगा येथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली ।

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर वंदन करून श्री गणेशाचे दर्शन घेन्यात आले फटाक्यांच्या अतिश बाजी मध्ये व बँजो लेझीम या गजरामध्ये क्रीडा प्रेमींच्या सहकार्याने ही रॅली बाळासाहेब ठाकरे मार्गे शिवाजी चौकामधून महात्मा बसवेश्वर मंदिरापर्यंत पोहोंचली ,तेथून बस्वेश्वरांची मूर्तीपूजा करून रॅलीचा सांगता समारोप महिला सांस्कृतिक सभाग्रह उमरगा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला.
यामध्ये विविध संघटनांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या त्यामध्ये व्यापारी महासंघाकडून सिद्रामप्पा चिंचोळे, नितीन होळे, उमरगा नगर पालिकेचे उपाध्यक्ष श्री हंसराज गायकवाड, अक्क महादेवी महिला मंडळाकडून राजश्री ताई माळगे तर श्री महात्मा बशेश्वर मंदिराकडून श्री परमेश्वर टोपगे, नगरसेवक विक्रम मस्के, आकाश दादा शिंदे, विजय वाघमारे, अशोक बनसोडे व विविध स्तरावरील संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कु. श्रेया व्हंडरे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाल्या श्रेयाने आम्हा महिलांसमोर मोठा आदर्श घडवून दिला आहे तिचे स्वप्न हे ऑलम्पिक पर्यंतचे आहे व तिचे स्वप्न पूर्ण होईल अशी  इच्छा व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ सुरेखा ताई मलंग, शरणु  काका येळापूर, एम. ओ. पाटील साहेब, शरणप्पा मलंग विद्यालयातील लेझीम पथक, डफ पथक व सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्र संचलन परमेश्वर सुतार यांनी केले तर शेवटी श्रेयाचे आजोबा श्री एस. के व्हंडरे यांनी उपस्थित सर्व उमरगा वासियांचे आभार मानले.

मुलांना खाऊ वाटप करून वंदे मातरम ने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



🌹🌹🌷🌷🌹🌹