👮♀👩🎓👩🏻🏫👩🔬👩🔧👩🚀👩⚖
*कै. शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये महिला दिन साजरा.*
*उमरगा आज दि. 08/03/2019 वार शुक्रवार प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये महिला दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील गणित शिक्षिका श्रीमती प्रभावती बिराजदार व श्रीमती मीनाक्षी हत्ते या उपस्थित होत्या.*
*कार्यक्रमाची सुरुवात आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर कुमारी गायत्री मंडले हिने महिलाचे गौरव गीत सादर केले तर कुमारी मोहिनी स्वामी हिने महिलांच्या शौर्य गाथा गीतातून मांडल्या तर कुमारी निकीता बेळंबे हिने 'मै तारा बनूंगी' हे गीत अतिशय मधुर आवाजामध्ये सादर केले.*
*त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती मीनाक्षी हत्ते मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च दिवशी का साजरा केला जातो ? हे सांगून आपण आईला जीवनामध्ये सर्वोच्च स्थान देतो. मुलीला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपतो व बहिणीला बहिणीची माया देतो व पत्नीला सहचारीनी म्हणून साथ देतो. पण हे सर्व कल्पनेतच न रंगवता आपण कृतीमध्ये जास्तीत जास्त उतरवले तर महिलांचा योग्य सन्मान होईल. आपण स्त्री भ्रूण हत्या कायमची थांबली व हुंडा घेण्या-देण्याबद्दल सुनेची छळवणूक सोडवली हेच महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शिवानी बिराजदार हिने केले तर आभार कुमारी दमयंती कलापे या विद्यार्थिनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद मुली व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजकुमार जाधव अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे,बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, दुशंत कांबळे आदींनी परिश्रम घेतले व वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.*
🌷💐🌷💐🌷💐🌷