Saturday, 11 January 2020

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला



📚📓📚📘📚📗📚📘

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मलंग विद्यालयाची भेट.*

  *दिनांक 11/01/2020 वार शनिवार रोजी मलंग विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली. इयत्ता दहावी मराठी अभ्यासक्रमातील कविता "आश्वासक चित्र" कवयित्री- 'नीरजा' यांच्याशी अभ्यासक्रमातील कविते विषयी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले साहित्यिक - नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी, कवियित्री अशा अनेक नामवंत साहित्यिकांशी मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संवाद साधला तसेच कथा-कथन, कवीकट्टा, नाटक, परिसंवाद इत्यादी साहित्य संमेलनामध्ये सादरीकरण झालेल्या अनेक कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंद घेतला.विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर तसेच मराठी विभाग प्रमुख - श्री अगतराव मुळे सर, मराठी शिक्षक - बालाजी हिप्परगे सर, राजकुमार जाधव सर, श्रीम.स्वाती उटगे मॅडम यांनीही मराठी साहित्य संमेलनाचा आनंद घेतला.*

📚📚📚📚📚📚📚📚
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹