Saturday, 30 March 2019

मतदान जनजागृती 2019

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*

    *आज दिनांक 01/04/2019 रोजी आमच्या विद्यालयामध्ये मतदान जनजागृती अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस. के. मलंग, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य  श्री व्हि. के. पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कुमारी गायत्री राजेंद्र मंडले या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक पटकाविला तर कुमारी शिवानी उदय बिराजदार या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला याबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.*
     *तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी समाजामधील जास्तीत-जास्त मतदारापर्यंत पोहचून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निश्चय याप्रसंगी केला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक परमेश्वर सुतार सर यांनी केले तर सहशिक्षक बालाजी हिप्परगे यांनी आभार मानले.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷








🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि. 26/03/2019 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.



 कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि. 27/03/2019 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील मतदार माहिती व  संकल्प पत्र विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आले.




कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
आज दि. 30/03/2019 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या रांगोळी स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले प्रथम पारितोषिक कु. शिवानी बिराजदार द्वितीय पारितोषिक कु.ऋतुजा स्वामी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
     अनेक महिला मतदारांनी येऊन ही रांगोळी पाहून कौतुक केले व मतदानाचे महत्व समजले सांगितले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी रांगोळी पाहून आई-वडिलांना मतदानाचे महत्व सांगण्याचे निश्चित केले.