Saturday, 7 November 2020

नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या अश्विनी रेऊरे हिचा सत्कार



 

कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

 


बालदिवस सप्ताह साजरा करणे बाबत दि. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

 


बालदिवस सप्ताह साजरा करणे बाबत दि. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर #baldivas2020
November 07, 2020
0
१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिवस म्हणून साजरा होतो. कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची. मुलांमध्ये मुल होऊन पंडितजी तासन् तास रमून जायचे. त्याचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या मते मुल हे देशाचे उज्वल भविष्य आहे आणि मुलांच्या उज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
#baldivas2020
#baldivas2020

बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, Tweeter यावर देखील #baldivas 2020 याचा वापर करून अपलोड करू शकतील.

बालदिवसाच्या निमित्ताने उपक्रम स्पर्धा
 खालील प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षिस देण्यात येईल व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

०८-११-२०२० 
इयत्ता १ ली व २ री भाषण मी नेहरु बोलतोय” या विषयावर ३ मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे. 

०९-११-२०२०
 इयत्ता ३ री ते ५ वी पत्रलेखन चाचा नेहरूंना पत्र लिहा. (शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A4 साईज कागदावर लिहून अपलोड करणे. 

१०-११-२०२० 
इयत्ता ६ वी ते ८ वी स्वलिखित कविता वाचन नेहरूंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडिओ अपलोड करणे. 

११-११-२०२० 
इयत्ता ६ वी ते ८ वी नाट्यछटा / एक पात्री नेहरुजींच्या जीवनावर आधारीत ३ मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे. 

१२-११-२०२० 
इयत्ता ९ वी ते १० वी पोस्टर करणे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे. 

२-११-२०२० 
इयत्ता ११ वी ते १२ वी निबंध लेखन १) स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुंचे योगदान २) नेहरु-औद्योगिक विकासाचा पा
या रचनारे ३) नेहरु- विज्ञान व तंत्रज्ञान 

१३-११-२०२० 
इयत्ता ९ वी ते १० वी निबंध लेखन १) नेहरु- स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण-घडणातील वाटा २) नेहरु- भारताचा शोध आत्मचरित्र (शब्द मर्यादा ७०० ते ८००) निबंध लिहून अपलोड करणे 

३-११-२०२०
 इयत्ता ११ वी ते १२ वी व्हिडिओ तयार करणे नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे. (५ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे) 

 ४-११-२०२० 
इयत्ता १ ली ते १२ वी बाल साहित्य ई-संमेलन नेहरूंशी संबंधीत कथा, कविता, प्रसंग सादर करणे (स्वरचित) वेळ ३ मिनिट 

तालुका स्तर पारितोषिक
गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 750₹ 500₹ 250
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 1000₹ 750₹ 500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 1200₹ 1000₹ 700
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 1500₹ 1000₹ 750

जिल्हा स्तर पारितोषिक
गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 1000₹ 750₹ 500
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 1200₹ 750₹ 500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 1500₹ 1200₹ 800
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 2000₹ 1500₹ 1000

        राज्य स्तर पारितोषिक

गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 2000₹ 1500₹ 1000
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 3000₹ 2000₹ 1500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 5000₹ 3000₹ 2000
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 7500₹ 5000₹ 2500