🌹 *कै.शरणप्पा मलंग वि.उमरगा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न* 🌹
आज दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी आमच्या मलंग विद्यालयांमध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपसचिव श्री एस के व्हंडरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी श्री एस के मलंग अध्यक्ष शालेय शिक्षण समिती शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा, वि के पाटील ज्येष्ठ सदस्य वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा,श्री आप्पासाहेब हत्ते सदस्य, श्री संतोष करपे सदस्य, श्री शिवराज बमचंडे सदस्य,मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्याच्या नंतर स शि परमेश्वर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी परेड रूपातून ध्वजाला मानवंदना दिली.मान्यवरांच्या स्वागतानंतर राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्डसाठी निवड झालेली विद्यार्थिनी कुमारी भक्ती शिवाजी शिंदे आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक श्री विवेकानंद पाचंगे यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.तसेच भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्यासाठी सहशिक्षक श्री परमेश्वर सुतार यांनी सर्व विद्यार्थ्यां कडून तंबाखूविरोधी शपथ म्हणून घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स शि श्रीमती मीनाक्षी हत्ते यांनी केले तर आभार स शि श्री बालाजी हिप्परगे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment