कै. शरणप्पा मलंग विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा.
उमरगा आज दि. 22/01/2019
कै. शरणप्पा मलंग विद्यालयांमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वंयशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कु. वैशाली धनराज हेबळे तर उपमुख्याध्यापीका कु. वैशाली यादव वाघुले त्यांनी दिवसभर शाळेची प्रशासकीय जबाबदारी पार पाडली.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव यावा म्हणून शालेय उपक्रमाअंतर्गत स्वयंशासन दिनाला अतिशय महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह वाढावा व अध्यापनाचा अनुभव मिळावा म्हणून कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांच्या पुढाकाराने विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न झाला.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेमध्ये व त्या-त्या विषयाचे उत्कृष्टपणे अध्यापन केले.
No comments:
Post a Comment