Monday, 30 December 2019

चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांमध्ये मलंग विद्यालयाचे यश.



🌹📖🌹📖🌹📖🌹📖

*चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांमध्ये मलंग विद्यालयाचे यश.*
    *चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.*
    *कथा लेखनामध्ये कु. पुजारी अशा महालिंग या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला तर चित्रकला स्पर्धेमध्ये कु. मेघा शशिकांत पाटील हिने तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकाविला, निबंध स्पर्धेमध्ये कु. प्रियंका वैजनाथ जाधव तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला या यशस्वीतेबद्दल वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब, संस्थेच्या सचिव सौ. सुरेखाताई मलंग,  शालेय समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व्हि. के पाटील, संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रेखाताई सूर्यवंशी, कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.*
     *या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अगतराव मुळे सर यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*

📖📖📖🌹🌹📖📖📖

Sunday, 29 December 2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी पुनश्च एकदा बिनविरोध निवड.



🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी पुनश्च एकदा बिनविरोध निवड.
     *मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांच्या निवडीबद्दल वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा संचलित कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर आणि कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा या दोन्ही विद्यालयाच्या वतीने  मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर यांच्या हस्ते श्री अजित गोबारे सरांचा सत्कार आला.*
  *आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वत्र आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उत्कृष्ट प्रशासनाच्या माध्यमातून शाळेची वेगळी ओळख निर्माण करणारे नेहमीच विद्यार्थ्यासाठी नवीन काहीतरी करण्याची संधी शोधणारे सर्व शिक्षक बांधवांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सतत प्रेरणा देणारे म्हणजे आमचे प्रेरणास्त्रोत अजित गोबारे सर यांची उमरगा तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी झालेली निवड ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा भावना शिक्षक बंधू भगिनी व्यक्त केल्या व पुढील कार्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Monday, 25 November 2019

कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये संविधान दिन साजरा 2019

🌷📖🌷📖🌷📖🌷📖






*कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये संविधान दिन साजरा.*
*http://malangvidhyalay.blogspot.com*
      *सन्मानीय शासनाच्या आदेशानुसार आज दि. 26 नोव्हेंबर 2019* रोजी कै. शरणप्पा विद्यालयांमध्ये सविधान दिन उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला *अध्यक्ष म्हणून कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर याचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून *इंग्रजी विभाग प्रमुख श्री राजकुमार जाधव सर* व  *मराठी विभाग प्रमुख श्री अगतराव मुळे सर* उपस्थित होते. 26/11 रोजी अतिरेक्यांनी मुंबई शहरा वरती केलेल्या अचानक हल्ल्यामध्ये अनेक वीर जवान अमर झाले. त्यामध्ये *हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे* यांच्या बरोबरच अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे रक्षण केले. याचबरोबर काही नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले या दुःख स्मृतीची आठवण म्हणून आज दिनांक 26/11/2019 रोजी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
  *संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन चाईल्ड ड्रीम्स सोशल फाउंडेशन* कै. शरणप्पा मलंग विद्यालय व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये *प्रतिक्षा बेंडके, दिपाली शिंदे, भक्ती शिंदे, शुभम पांचाळ, रोहित बिराजदार* आदी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपले विचार व्यक्त केले.
    यानंतर कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या तर्फे सामूहिक संविधानाचे पठण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे संविधानाचे वाचन केले.
    चाईल्ड ड्रीम्स सोशल फाउंडेशने वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
   वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री अगतराव मुळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या भाषणांचे परीक्षण केले.
  अशा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *विज्ञान विभाग प्रमुख श्री विवेकानंद पाचंगे सर* यांनी केले तर आभार विज्ञान शिक्षक *श्री परमेश्वर सुतार सर* यांनी मांडले.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, 19 November 2019

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद अंतर्गत मलंग विद्यालयची विभागस्तरीय निवड




राष्ट्रीय बालविज्ञान परिषद अंतर्गत मलंग विद्यालयची विभागस्तरीय निवड

   *महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेतून मलंग विद्यालयाची विभागस्तरीय निवड* 

दिनांक 19/11/2019 रोजी सरस्वती विद्यालय माकणी, याठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न झाली. 

या स्पर्धेमध्ये शरणप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि विद्यार्थ्यांनी *सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेचा आरोग्यावर होणारा परिणाम* या विषयावर प्रकल्पाचे सादरीकरण केले. 

विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल ग्रुप लीडर कु. बिराजदार शिवानी उदय आणि कु. मंडले गायत्री राजेंद्र या विद्यार्थिनींचे आणि  मार्गदर्शक शिक्षक,विज्ञान विभाग प्रमुख श्री विवेकानंद पाचंगे सर,  श्री राजकुमार जाधव सर  आणि विज्ञान शिक्षक परमेश्वर सुतार सर  

यांचे मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर यांच्या शुभहस्ते अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

🌹🌹🌷🌷🌹🌹

इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता 2019

            ..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कै. शरणप्पा मलंग विद्यालयात इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा.

    आज दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी  मलंग विद्यालयामध्ये 19 नोव्हेंबर हा दिन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म दिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून आमच्या मलंग
विद्यालयामध्ये अतिशय उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला.
   *या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री अजित गोबारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर व या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख श्री राजकुमार जाधव सर उपस्थित होते.*
    *भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केल्यानंतर प्रमुख वक्ते श्री राजकुमार जाधव सर यांचे इंदिरा गांधींच्या जीवनातील* *आदर्श या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ते म्हणाले की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गाणं कोकिळा लता* *मंगेशकर व राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या महिला म्हणजे भारतीय इतिहासातील ईश्वरीय चमत्कार आहे कारण लता मंगेशकरांचे गाणे आणि इंदिरा गांधी यांचे धोरण याची बरोबरी संपूर्ण जगामध्ये कोणीही करू शकले नाही. याचा आपणाला सार्थ अभिमान आहे. 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाबाद येथे* *भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व माता कमला देवी यांच्या पोटी या महान  भारतीय श्री रत्न इंदिरा गांधी  यांचा जन्म झाला. चेहऱ्यावरती सूर्यासारखे तेज प्रखर बुद्धिमत्ता आणि देशाविषयीचे प्रेम बाल पणापासूनच त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले वयाच्या अकराव्या वर्षी वानरसेना लहान मुलांची संघटना करून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये असे योगदान दिले की मोठ-मोठ्या क्रांतिकारकांना या चळवळीचे दाद घ्यावी लागली. त्याच वेळेस संपूर्ण देशाला कळले की ही* *अल्लड मुलगी नसून भविष्यात देशाची कणखर नेतृत्व करेल हे त्यांनी ओळखले कमी वयामध्ये त्या वडिलांसोबत संसदेमध्ये प्रवेश केल्या आणि अगदी बालपणातच राजकारणाचे धडे गिरवू लागले आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये* *स्वतःचा सहभाग नोंदवला आणि त्या तरुण राजकारणी महिला म्हणून सर्वांना परिचित होऊ लागल्या पण त्यांनी शिक्षणाकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही म्हणून त्यांना जगातील सर्व उत्कृष्ट विद्यापीठाने डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या व त्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी जो राजकारणात प्रवेश केला तो* *अखेरपर्यंत यशस्वी यशस्वी ठरला आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण, अनुचाचण्या आणि पाकिस्तान सोबत छेडलेले युद्ध असे यशस्वी कार्यक्रम राबवल्या व त्या भारताच्या यशस्वी पंतप्रधान म्हणून आपला जीवनप्रवास यशस्वी करून दाखवला त्यांची ही यशोगाथा लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी "मरावे परी कीर्तिरूपे उरावे"  या म्हणीप्रमाणे भारतीय लोकशाही जोपर्यंत भारतात* *आहे, तोपर्यंत त्या अमर राहतील म्हणुन  त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्वल करण्याचा शोध घेतला पाहिजे असे ते म्हणाले.*
  *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी मानले.*
  *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील अगतराव मुळे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, प्रभावती बिराजदार,  मीनाक्षी हत्ते, मोहन साखरे, दुषंण कांबळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Sunday, 10 November 2019

मौलाना आझाद शिक्षण दिन 2019








कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिक्षण दिन साजरा.

   आज दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद शिक्षण दिन म्हणून मलंग विद्यालयामध्ये उत्साहामध्ये संपन्न.

  *मौलाना आजाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र असे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर हे उपस्थित होते.*
   
   *या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख मार्गदर्शक विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बालाजी हिप्परगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणाची सर्व धुरा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. आज एकविसाव्या शतकामध्ये भारत देशाने जी प्रगती केली आहे यामध्ये मौलाना अब्दुल कलाम यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.*
   
   *या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, परमेश्वर सुतार, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, प्रभावती बिराजदार,  मीनाक्षी हत्ते, मोहन साखरे, दुषंत कांबळे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
    *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी करून आभार मानले.*
🌷🌷🌷🙏🏻🌷🌷🌷

Monday, 14 October 2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालया मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
📚📖📚📖📚📖📚📖
➖➖➖➖➖➖➖➖

*कै. शरणप्पा मलंग विद्यालया मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा.*

    *आज दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी भारताचे मिसाइल मॅन माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मलंग विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न.*
    *प्रथमता डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री अजित गोबारे व प्रमुख पाहुणे कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे ज्येष्ठ सहशिक्षक सुभाष कलापे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स.शि.परमेश्वर सुतार हे उपस्थित होते.*
    *स्वप्न म्हणजे ते नव्हे जे तुम्ही झोपल्यानंतर पाहता स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही या विचाराने सर्व विद्यार्थ्यांना तरुणांना भविष्यातील भारत घडवण्याचे आव्हान करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील एक थोर शास्त्रज्ञ त्यासोबतच भारताचे माजी राष्ट्रपती होते  "अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे"  याप्रमाणे आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी उच्च ध्येयाची निश्चिती करून ते साध्य केले असे मत श्री सुतार यांनी व्यक्त केले.*
    *मोठा भाऊ दुकान चालवत असताना छोटा भाऊ शिंपले विकत असताना आणि वडील नावाडी चालवत असताना सुद्धा आपल्या शिक्षणातील अडचणी बाजूला सारून,घरातील सर्वांच्या मदतीने त्यावर मात करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.*
   *तसेच ते एक संवेदनशील व्यक्ती होते रुद्रवीना वाजविणे,मुलांशी गप्पा मारणे हे त्यांचे छंद होते.आपण सर्वांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून अनमोल असे विचार घ्यावेत आणि त्याचे अंगीकरण करून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी,त्यांनी लिहिलेले पुस्तके विंग्ज ऑफ फायर इंडिया, माय ड्रीम इग्नायटेड माईंड अशी पुस्तके आपण वाचून घ्यावेत, विविध पुस्तके वाचत राहावे तेव्हाच खऱ्या अर्थाने आजचा वाचन प्रेरणा दिन सार्थकी लागेल असे श्री परमेश्वर सुतार सर म्हणाले शेवटी विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगितलेला हा विचार कायमचा लक्षात ठेवावा की "टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट यु ह्याव टू बर्न लाईक सन"असे ते म्हणाले.*
    *या कार्यक्रमासाठी  सर्व शिक्षक वृंद राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे,  बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे, दुशंत कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री अगतराव मुळे सर यांनी केले व शेवटी आभार मानले.*

💐💐💐💐💐💐💐💐
📖📚📖📚📖📚📖📚

Saturday, 7 September 2019










मलंग विद्यालयांमध्ये सुरमय सकाळ

  आज दिनांक 7 सप्टेंबर 2019 रोजी विद्यालयामध्ये रोटरी क्लब उमरगा चे अध्यक्ष रोटेरियन प्राध्यापक डॉ. विनोद देवकर आणि रोटरी क्लब उमरगा चे सचिव प्राध्यापक युसुफ मुल्ला, तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील संगीत शिक्षक प्राध्यापक मुरलीधर जाधव यांच्या शुभ हस्ते श्रीच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.
     श्रीच्या पूजनानंतर विद्यालयामध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष  प्राध्यापक डॉ. विनोद देवकर  यांच्या अध्यक्षतेखाली सुरमय सकाळ भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
       यावेळी रोटरी क्लब उमरगा चे सचिव प्राध्यापक युसुफ मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर मंचावर विराजमान होते.
    मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यानंतर प्राध्यापक मुरलीधर जाधव यांनी सुरमय सकाळ या कार्यक्रमात भक्तीगीतांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी चिरंजीव शिंदे रितेश महादेव आणि कुमारी हलकट्टी आरती शिवकुमार या विद्यार्थ्यांनीही भक्ती गीताचे सादरीकरण केले.
  याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    विद्यालयातील सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.


Thursday, 5 September 2019













मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त बोलताना  - डॉ. उदय मोरे 

आज दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये  उमरगा शहरातील प्रख्यात डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपा मोरे तसेच रोटेरीयन शिवानंद दळगडे माजी प्राचार्य आदर्श विद्यालय या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते विद्यालय मध्ये स्थापित पर्यावरण पूरक श्री च्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

त्यानंतर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सुरेखा ताई मलंग यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय मोरे डॉ. दीपा मोरे रोटे. शिवानंद दळगडे हे उपस्थित होते तर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व्ही. के. पाटील हेमान्यवर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर व मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर हे मंचावर विराजमान होते.
    प्रमुख पाहुणे डॉ. उदय मोरे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु आई-वडील असून आपल्या जीवनाला आकार देणारे दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक हे आपल्यासाठी ईश्वरा समान असतात.
    भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केले पाहिजे असे मत डॉ. उदय मोरे यांनी व्यक्त केले.
   मलंग विद्यालयातील सहशिक्षक बालाजी हिप्परगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती विशद केली.
    तसेच याप्रसंगी डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपक मोरे यांनी आपल्या शुभहस्ते विद्यालयाला दोन वृक्ष भेट स्वरूपात प्रदान केले तर रोटे. शिवानंद दगडे  यांनी विद्यालयातील ग्रंथालयासाठी अकरा पुस्तकांची भेट सुपूर्द केली.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुरेखाताई मलंग यांच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या.
    सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Wednesday, 4 September 2019




🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा*

   *आज दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त श्रीची पूजा उमरगा नगरीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व सन्माननीय                     आकाश दादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.*
     *याप्रसंगी विद्यालयाचे  मुख्याध्यापक अजित गोबारे सर मुख्याध्यापक  कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*याप्रसंगी श्री गणेश उत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धा विद्यालय मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व सुंदरशा रांगोळ्या रेखाटल्या.*
🌹🌹🌷🌷🌹🌹

Monday, 2 September 2019

मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना 2019















मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

आज दिनांक 2 सप्टेंबर 2019 वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित, कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा आणि कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा या विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती ची स्थापना श्री व सौ मलंग यांच्या हस्ते करण्यात आली.

गणेशोत्सव म्हणजे एक प्रचंड उत्साह प्रचंड प्रसन्नता पण त्यामध्ये नकळतपणे निसर्गाची हानी होत असेल तर विचार करणे गरजेचे आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यासाठी विद्यालयांमध्ये कुठल्याही केमिकलचा वापर न करता  बनवलेली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब आणि वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ सुरेखा ताई मलंग यांच्या शुभहस्ते श्रीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
  तसेच विद्यालयातील जवळपास दोनशे ते अडीशे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपतीची निर्मिती केली आणि त्याच गणपतीची घरामध्ये स्थापना करण्याचे ठरविले.
आज मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या गणपती मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर जल प्रदूषण प्रदूषण होत असते तेव्हा या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे
गेल्या वर्षी म्हणजे 2018 पासून पर्यावरणपूरक गणपती स्थापना करण्याचा निश्चय विद्यालयाने केला आणि तोच निश्चय विद्यार्थ्यांमध्ये रुजविला.
आम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवून घरामध्ये याची स्थापना करत आहोत यामध्ये आम्हाला वेगळा आनंद मिळत आहे कारण यामुळे आम्हाला पर्यावरण संवर्धन यामध्ये सहभागी होता येत आहे असे मत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची पाहणी करताना वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम एस मलंग साहेब आणि सचिव सौ सुरेखाताई मलंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
   याप्रसंगी शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय उमरगा चे अध्यक्ष श्री एस. के. मलंग तसेच वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्ही. के. पाटील तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर आणि मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.