राष्ट्रीय बालविज्ञान परिषद अंतर्गत मलंग विद्यालयची विभागस्तरीय निवड
*महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेतून मलंग विद्यालयाची विभागस्तरीय निवड*
दिनांक 19/11/2019 रोजी सरस्वती विद्यालय माकणी, याठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये शरणप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि विद्यार्थ्यांनी *सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेचा आरोग्यावर होणारा परिणाम* या विषयावर प्रकल्पाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल ग्रुप लीडर कु. बिराजदार शिवानी उदय आणि कु. मंडले गायत्री राजेंद्र या विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षक,विज्ञान विभाग प्रमुख श्री विवेकानंद पाचंगे सर, श्री राजकुमार जाधव सर आणि विज्ञान शिक्षक परमेश्वर सुतार सर
यांचे मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर यांच्या शुभहस्ते अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
🌹🌹🌷🌷🌹🌹
No comments:
Post a Comment