🌹📖🌹📖🌹📖🌹📖
*चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनांमध्ये मलंग विद्यालयाचे यश.*
*चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.*
*कथा लेखनामध्ये कु. पुजारी अशा महालिंग या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला तर चित्रकला स्पर्धेमध्ये कु. मेघा शशिकांत पाटील हिने तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकाविला, निबंध स्पर्धेमध्ये कु. प्रियंका वैजनाथ जाधव तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला या यशस्वीतेबद्दल वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब, संस्थेच्या सचिव सौ. सुरेखाताई मलंग, शालेय समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व्हि. के पाटील, संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रेखाताई सूर्यवंशी, कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.*
*या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अगतराव मुळे सर यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*
📖📖📖🌹🌹📖📖📖
No comments:
Post a Comment