मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त बोलताना - डॉ. उदय मोरे
आज दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये उमरगा शहरातील प्रख्यात डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपा मोरे तसेच रोटेरीयन शिवानंद दळगडे माजी प्राचार्य आदर्श विद्यालय या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते विद्यालय मध्ये स्थापित पर्यावरण पूरक श्री च्या मूर्तीची पूजा करण्यात आली.
त्यानंतर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सुरेखा ताई मलंग यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय मोरे डॉ. दीपा मोरे रोटे. शिवानंद दळगडे हे उपस्थित होते तर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व्ही. के. पाटील हेमान्यवर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर व मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर हे मंचावर विराजमान होते.
प्रमुख पाहुणे डॉ. उदय मोरे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु आई-वडील असून आपल्या जीवनाला आकार देणारे दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक हे आपल्यासाठी ईश्वरा समान असतात.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केले पाहिजे असे मत डॉ. उदय मोरे यांनी व्यक्त केले.
मलंग विद्यालयातील सहशिक्षक बालाजी हिप्परगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती विशद केली.
तसेच याप्रसंगी डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपक मोरे यांनी आपल्या शुभहस्ते विद्यालयाला दोन वृक्ष भेट स्वरूपात प्रदान केले तर रोटे. शिवानंद दगडे यांनी विद्यालयातील ग्रंथालयासाठी अकरा पुस्तकांची भेट सुपूर्द केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुरेखाताई मलंग यांच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
No comments:
Post a Comment