Thursday, 24 December 2020
Monday, 21 December 2020
Saturday, 7 November 2020
बालदिवस सप्ताह साजरा करणे बाबत दि. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा
November 07, 2020
0
१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिवस म्हणून साजरा होतो. कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची. मुलांमध्ये मुल होऊन पंडितजी तासन् तास रमून जायचे. त्याचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या मते मुल हे देशाचे उज्वल भविष्य आहे आणि मुलांच्या उज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
#baldivas2020

बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, Tweeter यावर देखील #baldivas 2020 याचा वापर करून अपलोड करू शकतील.
बालदिवसाच्या निमित्ताने उपक्रम स्पर्धा
खालील प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. सदर विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षिस देण्यात येईल व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
०८-११-२०२०
इयत्ता १ ली व २ री भाषण मी नेहरु बोलतोय” या विषयावर ३ मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे.
०९-११-२०२०
इयत्ता ३ री ते ५ वी पत्रलेखन चाचा नेहरूंना पत्र लिहा. (शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A4 साईज कागदावर लिहून अपलोड करणे.
१०-११-२०२०
इयत्ता ६ वी ते ८ वी स्वलिखित कविता वाचन नेहरूंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडिओ अपलोड करणे.
११-११-२०२०
इयत्ता ६ वी ते ८ वी नाट्यछटा / एक पात्री नेहरुजींच्या जीवनावर आधारीत ३ मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे.
१२-११-२०२०
इयत्ता ९ वी ते १० वी पोस्टर करणे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे.
२-११-२०२०
इयत्ता ११ वी ते १२ वी निबंध लेखन १) स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुंचे योगदान २) नेहरु-औद्योगिक विकासाचा पा
या रचनारे ३) नेहरु- विज्ञान व तंत्रज्ञान
१३-११-२०२०
इयत्ता ९ वी ते १० वी निबंध लेखन १) नेहरु- स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण-घडणातील वाटा २) नेहरु- भारताचा शोध आत्मचरित्र (शब्द मर्यादा ७०० ते ८००) निबंध लिहून अपलोड करणे
३-११-२०२०
इयत्ता ११ वी ते १२ वी व्हिडिओ तयार करणे नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे. (५ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे)
४-११-२०२०
इयत्ता १ ली ते १२ वी बाल साहित्य ई-संमेलन नेहरूंशी संबंधीत कथा, कविता, प्रसंग सादर करणे (स्वरचित) वेळ ३ मिनिट
| गट \ विजेता | प्रथम क्रमांक | द्वितीय क्रमांक | तृतीय क्रमांक | 
|---|---|---|---|
| इयत्ता 1 ली व 2 री | ₹ 750 | ₹ 500 | ₹ 250 | 
| इयत्ता 3 री ते 5 वी | ₹ 1000 | ₹ 750 | ₹ 500 | 
| इयत्ता 6 वी ते 8 वी | ₹ 1200 | ₹ 1000 | ₹ 700 | 
| इयत्ता 9 वी ते 12 वी | ₹ 1500 | ₹ 1000 | ₹ 750 | 
| गट \ विजेता | प्रथम क्रमांक | द्वितीय क्रमांक | तृतीय क्रमांक | 
|---|---|---|---|
| इयत्ता 1 ली व 2 री | ₹ 1000 | ₹ 750 | ₹ 500 | 
| इयत्ता 3 री ते 5 वी | ₹ 1200 | ₹ 750 | ₹ 500 | 
| इयत्ता 6 वी ते 8 वी | ₹ 1500 | ₹ 1200 | ₹ 800 | 
| इयत्ता 9 वी ते 12 वी | ₹ 2000 | ₹ 1500 | ₹ 1000 | 
राज्य स्तर पारितोषिक
| गट \ विजेता | प्रथम क्रमांक | द्वितीय क्रमांक | तृतीय क्रमांक | 
|---|---|---|---|
| इयत्ता 1 ली व 2 री | ₹ 2000 | ₹ 1500 | ₹ 1000 | 
| इयत्ता 3 री ते 5 वी | ₹ 3000 | ₹ 2000 | ₹ 1500 | 
| इयत्ता 6 वी ते 8 वी | ₹ 5000 | ₹ 3000 | ₹ 2000 | 
| इयत्ता 9 वी ते 12 वी | ₹ 7500 | ₹ 5000 | ₹ 2500 | 
Saturday, 19 September 2020
अभिनंदन... अभिनंदन.... अभिनंदन..... सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
🇮🇳 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निबंध स्पर्धा - 2020
निकाल खालील प्रमाणे :-
🥇 प्रथम :- कु. गायत्री गुरुसंत बागुले -10 वी सेमी
🥈 द्वितीय :- कु. शुभांगी व्यंकटराव बिराजदार - 10वी सेमी
🥉 तृतीय:- चि. पंकज लक्ष्मण गुरव - 9 वी सेमी
🏅 उत्तेजनार्थ :- चि. सुमेश ज्ञानेश्वर औटे -8वी सेमी
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
Friday, 28 August 2020
श्री गणेश व्याख्यान माला : पुष्प सहावे संपन्न शरणप्पा मलंग विद्यालय व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा. व्याख्याते:- श्री शशिकांत काशीनाथ बोराळकर. -संचालक युनिक अकॅडमी,कोल्हापूर. विषय: 10वि 12वि नंतर MPSC आणि UPSC चि तयारी कशी करावी.
Sunday, 16 August 2020
Friday, 14 August 2020
शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा - 2020
👨💻👩💻👨💻👩💻👨💻👩💻👨💻👩💻👨💻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये ऑनलाईन स्वातंत्र्यदिन साजरा.
*प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा येथील प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला पण कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या वर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री आप्पासाहेब हत्ते मामा उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मलंग विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदीराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मलंग विद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन सहभाग नोंदविला व त्याप्रमाणे इयत्ता दहावी ब ची विद्यार्थिनी उमा पुजारी, विश्रांती जमादर,मनीषा ब्याळे या विद्यार्थिनींनी शाळेच्या गणवेषामध्ये झेंडा गीत सादर केले असंख्य विद्यार्थ्यांनी एक सूर एक ताल देशभक्तीपर समूह गीत सादर केले तर प्रतिवर्षाप्रमाणे क्रांतिकारकांच्या वेशभूषेमध्ये ऑनलाइन उपस्थित होते.*
*यावेळी मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्काऊट ध्वजास मानवंदना दिली. दोन्ही शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद घेतला तर स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या 12 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यात क्रांतीकारकांचे योगदान या विषयावरती मलंग विद्यालयातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला या स्पर्धेचा निकाल परीक्षक श्री परमेश्वर सुतार सर यांनी ऑनलाईन जाहीर केला यामध्ये सर्वप्रथम मंडले गायत्री राजेंद्र तर द्वितीय शिंदे रितेश महादेव तृतीय बिराजदार शिवानी उदय उत्तेजनार्थ शिंदे प्रार्थना माधव यांनी पारितोषिक पटकाविले. या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.*
*या कार्यक्रमाचे ऑनलाइन सूत्रसंचालन श्रीमती मीनाक्षी जाधव मॅडम यांनी केले तर आभार श्रीब्रह्मानंद गायकवाड यांनी मांडले.*
*स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे नियोजन तंत्रस्नेही शिक्षक श्री परमेश्वर कोळी यांनी केले.*
🌹🇮🇳👩💻👨💻🌹🇮🇳👩💻👨💻🌹
Monday, 3 August 2020
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - 2020
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*कै.शरणप्पा मलंग विद्यालयातील इयत्ता आठवी, नववी, दहावी मराठी व सेमी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाइन Google Meet या Aap द्वारे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.*
*ही स्पर्धा दिनांक 12 ऑगस्ट 2020 वार बुधवार रोजी ठीक सकाळी 10:00 वाजता ऑनलाइन Google meet App च्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟣 *स्पर्धेचा विषय :-*
*भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान.*
🟣 *वेळ :- 3 मिनिटे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मलंग विद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे खालील गुगल फॉर्म च्या माध्यमातून नोंदवावीत.*
👇👇👇👇👇👇👇👇👇
_*https://forms.gle/tWEMfen5ifeM2mdh9*_
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰*
💠 *ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे :-*
*अध्यक्ष :- मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर*
*प्रमुख पाहुणे तथा परीक्षक :-*
*श्री राजकुमार जाधव सर*
*श्री परमेश्वर सुतार सर*
*सुत्रसंचालन :- श्री विवेकानंद पाचंगे सर*
*ऑनलाइन कार्यक्रम आयोजक :- श्री परमेश्वर कोळी सर*
_*प्रथम, द्वितीय, तृतीय विजयीत्यास ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.*_
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
Wednesday, 29 July 2020
कै.शरणप्पा मलंग विद्यालयाची,यशस्वी निकालाची उज्वल परंपरा. इयत्ता10 वी मार्च 2020 चा निकाल 98.57%
*अभिनंदन !अभिनंदन!! अभिनंदन!!!*
*कै.शरणप्पा मलंग विद्यालयाची,यशस्वी निकालाची उज्वल परंपरा.*
*10 वी मार्च 2020 चा निकाल 98.57%.*
*90% पेक्षा जास्त टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेले एकूण विध्यार्थी - 21.*
*गुणानुक्रमे प्रथम येणारे 03 विद्यार्थी.*
*1) कु.बिराजदार तनवी रणजीत - 98.60%*
*2)कु.पाटील मेघा शशीकांत - 98.20%*
*3)कु.शिंदे दिपाली सतीश - 96.80%*
*90% पेक्षा जास्त टक्के घेणारे विध्यार्थी.*
*4)कु. जाधव प्रियंका वैजीनाथ - 96.20%*
*5) कोगनुरे श्रुती राजेंद्र 96%*
*6) बिराजदार रोहित बाबुराव 95.80%*
*7)कदम वैष्णवी पांडुरंग 95.80%*
*8)पांचाळ शुभम चौडाप्पा 95.40%*
*9) मोरे दीपक पांडुरंग 94.20%*
*10)शिंदे भक्ती शिवाजी 94.20%*
*11) वाले आर्या सुरेंद्र 93.80%*
*12) घोडके अभिषेक बिरू 93.80%*
*13) कोकणे महादेव श्याम 93.80%*
*14)पवार शुभम प्रकाश 93.60%*
*15) लोहार रेशमा रवींद्र 93.20%*
*16) पुजारी आशा महालिंग 92.60%*
*17)कोळनुरे संकेत संजीव 91.60%*
*18) पाटील वैष्णवी संजीव कुमार 91.20%*
*19) कोगनुरे श्रद्धा राजेंद्र 90.40%*
*20) सुतार पुजा तानाजी 90.20%*
*21) वाकडे विजयालक्ष्मी गुंडप्पा 90%.*
*एकूण 140 पैकी 138 विध्यार्थी उत्तीर्ण.*
*Distinction मध्ये एकूण 73 विद्यार्थी.*
*सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे,*
*वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा चे अध्यक्ष डॉ. एम. एस.मलंग साहेब,सचिव सौ. सुरेखाताई मलंग आई, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के.मलंग, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व्ही.के.पाटील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, यांच्या वतीने आणि*
*कै. शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.*
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
Wednesday, 8 July 2020
Sunday, 24 May 2020
Friday, 15 May 2020
Thursday, 5 March 2020
स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्कार परीक्षेमध्ये मलंग विद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांचे यश.
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
*स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्कार परीक्षेमध्ये मलंग विद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांचे यश*
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड च्या वतीने उस्मानाबाद भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे *दिनांक 02/12/ 2019 ते 05/12/2019* या कालावधीत *राज्य पुरस्कार स्काऊट चाचणी शिबिर* आयोजन करण्यात आले होते.
या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेमध्ये *कै. शरणप्पा मलंग विद्यालयातील एकूण 15 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेले आहे.*
यामध्ये इयत्ता आठवी व नववी वर्गातील यशस्वी विद्यार्थी :-
*1) हर्षवर्धन संजय जाधव*
*2) श्रीकांत चंद्रकांत खराडे*
*3) समर्थ उद्धव वाकडे*
*4) आशिष महादेव वाकडे*
*5) वेदांत राजेंद्र पटवारी*
*6) उदयराज सुभाष गायकवाड*
*7) अनिकेत शिवाजी सूर्यवंशी*
*8) अजिंक्य वीरेंद्र माशाळकर*
*9) रमण लक्ष्मण सोमानी*
*10) रतनकुमार पंचय्या स्वामी*
*11) रेहान सरफराज बागवान*
*12) कृष्णा संतोष सोनटक्के*
*13) व्यंकटेश सिद्धेश्वर वाकडे*
*14) महेश गुंडू मुलगे*
*15) रविराज युवराज शिंदे*
या विद्यार्थ्यांचा समावेश आहे
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मलंग विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा आणि *मार्गदर्शक शिक्षक श्री परमेश्वर कोळी सर* यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतील स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून शाळेचे स्काऊट गाईड पथक सतत कार्यशील ठेवले आहे *त्याबद्दल विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे मत मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी व्यक्त केले.*
वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे *अध्यक्ष डॉ. श्री एम. एस. मलंग साहेब,* वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या *सचिव सौ. सुरेखा ताई मलंग* तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष *श्री एस. के. मलंग* वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे *सदस्य अप्पासाहेब हत्ते* यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
 

 

































