Tuesday, 31 July 2018


कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

आज दि. 01/08/2018 वार :- बुधवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे  जयंती  उत्साहात साजरी करण्यात आलीे. कार्यक्रमाचे अध्यक्ष *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* व प्रमुख पाहुणे  *कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* व मार्गदर्शक *श्री अगतराव मुळे सर* व *श्री परमेश्वर सुतार सर* यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  *श्रीमती हत्ते मॅडम* केले व आभार व्यक्त केले.

💐💐💐💐💐💐💐



🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄


Friday, 27 July 2018

गुरु पौर्णिमेनिमित्य डॉ. अनिकेत इनामदार यांचे मार्गदर्शन

🌷🌷🌹🌹

*कै. शरणप्पा मलंग विद्यालयात गुरु पौर्णिमेनिमित्य डॉ. अनिकेत इनामदार यांचे मार्गदर्शन*



आज दि. 27/07/2018 वार - शुक्रवार रोजी आमच्या विद्यालयात भारतातील आद्य गुरु श्री ऋषिवर व्यास यांचा जन्मदिवस म्हणजे गुरु पोर्णिमा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सौ. सुरेखा ताई मलंग,सचिव वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा* या होत्या. तर उमरग्यातील *प्रख्यात डॉ. अनिकेत इनामदार हे मुख्य मार्गदर्शक* म्हणून उपस्थित होते याप्रसंगी *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एम. एस. मलंग साहेब* तसेच *शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय चे अध्यक्ष श्री एस के मलंग अप्पा* हे प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर विराजमान होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि ज्येष्ठ सह शिक्षक श्री कलापे सर हे उपस्थित होते.
                  बोलत असताना डॉ. इनामदार म्हणाले आज नकारात्मक विचार वाढत आहे.तेव्हा अशा नकारात्मक विचार वाढवणाऱ्या टीव्ही सोशल मीडिया यासारख्या साधनापासून आपण जास्त काळ दूर राहिले पाहिजे आणि योग्य तितकाच गरजेनुसार वापर केला पाहिजे. ते पुढे म्हणाले खऱ्या अर्थाने भारत घडवण्याचे कार्य शिक्षक करत आहेत.आजच्या दिवशी आयुष्यातील सर्व गुरूंना नतमस्तक व्हायला हवे.
या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी  उपस्थित होते.

श्री परमेश्वर सुतार सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.




🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

Wednesday, 25 July 2018

कारगिल दिन 2018



🌹🌹🌷🌷🌹🌹

*दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायकांदो स्पर्धेत,*
*कु.श्रेया श्रीशैल व्हंडरे हिने रौप्यपदक पटकाविल्याबद्दल तिचा उमरगा येथे भव्य नागरी सत्कार.*

दक्षिण कोरिया मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय तायकांदो स्पर्धेमध्ये कु. श्रेया व्हंडरे हिने रौप्य पदक मिळवल्यामुळे उमरगा शहरात बुधवारी सकाळी राजेशाही थाटामध्ये तिचे स्वागत करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे तिचे आगमन होताच ,नगराध्यक्षा सौ. प्रेमलताताई टोपगे, नगरसेवक श्री एम. ओ. पाटील, नगरसेवक महेश माशाळकर, लिंगायत समाजाचे अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ मलंग साहेब, तसेच लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष वैजिनाथ अप्पा माशाळकर, ज्येष्ठ सदस्य शरणुकाका येळापूरे, प्रकाश वाकडे, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर, धनप्पा अरबळे यांनी तसेच प्रदीप गिरीबा,बाळू परांडे, महादेव पाटील, राजीव अरबळे, तम्मा मामा माळगे, नागेश दंडगे, बसवराज चलगिरे, यांच्यासह आकाश दादा शिंदे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिचा सत्कार केला.
               उमरगा शहरातुन श्रेया हिने ऐतिहासिक कामगिरी करून उमरगा शहराचा झेंडा अटकेपार नेला आहे म्हणून श्रेया व्हंडरे हिची हुतात्मा स्मारकापासून ते शिवाजी चौक उमरगा येथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली ।

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर वंदन करून श्री गणेशाचे दर्शन घेन्यात आले फटाक्यांच्या अतिश बाजी मध्ये व बँजो लेझीम या गजरामध्ये क्रीडा प्रेमींच्या सहकार्याने ही रॅली बाळासाहेब ठाकरे मार्गे शिवाजी चौकामधून महात्मा बसवेश्वर मंदिरापर्यंत पोहोंचली ,तेथून बस्वेश्वरांची मूर्तीपूजा करून रॅलीचा सांगता समारोप महिला सांस्कृतिक सभाग्रह उमरगा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला.
यामध्ये विविध संघटनांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या त्यामध्ये व्यापारी महासंघाकडून सिद्रामप्पा चिंचोळे, नितीन होळे, उमरगा नगर पालिकेचे उपाध्यक्ष श्री हंसराज गायकवाड, अक्क महादेवी महिला मंडळाकडून राजश्री ताई माळगे तर श्री महात्मा बशेश्वर मंदिराकडून श्री परमेश्वर टोपगे, नगरसेवक विक्रम मस्के, आकाश दादा शिंदे, विजय वाघमारे, अशोक बनसोडे व विविध स्तरावरील संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कु. श्रेया व्हंडरे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाल्या श्रेयाने आम्हा महिलांसमोर मोठा आदर्श घडवून दिला आहे तिचे स्वप्न हे ऑलम्पिक पर्यंतचे आहे व तिचे स्वप्न पूर्ण होईल अशी  इच्छा व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ सुरेखा ताई मलंग, शरणु  काका येळापूर, एम. ओ. पाटील साहेब, शरणप्पा मलंग विद्यालयातील लेझीम पथक, डफ पथक व सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्र संचलन परमेश्वर सुतार यांनी केले तर शेवटी श्रेयाचे आजोबा श्री एस. के व्हंडरे यांनी उपस्थित सर्व उमरगा वासियांचे आभार मानले.

मुलांना खाऊ वाटप करून वंदे मातरम ने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



🌹🌹🌷🌷🌹🌹

Monday, 23 July 2018

मलंग विद्यालयांमध्ये वृक्षारोपण


कै.शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा येथे वृक्षारोपण संपन्न
आज -  दि. 22 जुलै 2018 रोजी रोटरी क्लब ऑफ उमरगा चे नूतन अध्यक्ष संतरामजी मुरजानी यांच्या हस्ते आमच्या कै. शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा येथे वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एम. एस. मलंग साहेब, तसेच शालेय शिक्षण समिती, मलंग विद्यालय चे अध्यक्ष श्री एस के मलंग साहेब वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री अप्पु हत्ते साहेब तसेच रोटेरियन प्रा. डॉ. संजय अस्वले रोटेरियन मनीष सोनी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रोटे.श्री अजित गोबारे सर तसेच रोटे.परमेश्वर सुतार सर  रोटे. कलशेट्टी पाटील सर सतीश कटके सर,बालाजी हिप्परगे सर, परमेश्वर कोळी सर
आणि विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी रोटे.संतरामजी मुर्जानी यांचा वाढदिवस डॉ.एम एस मलंग साहेब यांच्या हस्ते *Interact Club Of Malang School Omerga च्या वतीने साजरा करण्यात आला.