Saturday, 18 June 2022

इ. 10 वी बोर्ड परीक्षा निकाल -2021-22

 



💐🏆💐🏆💐🏆💐

*इ. 10 वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शरणप्पा मलंग विद्यालयातर्फे सत्कार.*

    *उमरगा दि. 18/06/2022 वार शनिवार रोजी,शरणप्पा मलंग विद्यालयामधून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचे व संस्थेचे नावलौकिक केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला,त्यामध्ये विद्यालयातून सर्व प्रथम आलेला चि. गाडेकर संदीप शिवाजी - 97.20% तर शाळेतून सर्व द्वितीय आलेली कु. पटवारी समृद्धी जयराज - 97.00% व शाळेमधून सर्व तृतीय आलेला चि.खराडे श्रीकांत चंद्रकांत - 96.60% या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री एस. के.मलंग साहेब, नूतन संचालक श्री प्रवीण माशाळकर, शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फेटा-शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला त्यांच्या गुणवत्तेचा गौरव केला.*
    *यावेळी आपण गुणवंत विध्यार्थ्यांनी भावी जीवनामध्ये अशाच प्रकारचे उत्तुंग यश संपादन करून स्वतःबरोबरच आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे अशा शुभेच्छा सर्वांकडून या यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.*
     *या सत्कार कार्यक्रमासाठी शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री राजकुमार जाधव सर,श्री अगतराव मुळे सर, श्री सतीश कटके सर, श्री विवेनंद पाचंगे सर, श्री बालाजी हिप्परगे सर, श्री परमेश्वर सुतार सर, श्री परमेश्वर कोळी सर, श्रीमती प्रभावती बिराजदार मॅडम, श्री कलशेट्टी पाटील सर यांनी सत्काराचे नियोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.*

💐🏅💐🏅💐🏅💐


No comments:

Post a Comment