Friday, 17 December 2021

शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा.





*शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा.*


    *उमरगा आज दि. 18/12/2021 वार शनिवार रोजी शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये भित्ती पत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांबरोबरच भरपूर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला व त्यामधून सर्वप्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान चि. आसिफ मोहदिन मुल्ला द्वितीय क्रमांक कु. मदिहा सत्तार मुल्ला तर तृतीय क्रमांक कु. आएशा चाँदपाशा शेख या विद्यार्थ्यांनी मिळविला.*

     *अल्पसंख्यांक हक्क दिनाचे महत्त्व सांगत असताना अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री विवेकानंद पाचंगे सर म्हणाले 2 जानेवारी 2006 हा दिवस अल्पसंख्यांक मंत्रालयाने अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्यासाठी जाहीर केले त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन अल्पसंख्यांक समाजाचा अंतर्भाव करण्यात आला अधिसूचित अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय व पर्यावरण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.  संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकाच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला तेव्हापासून दर वर्षी 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कलम 26 नुसार अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता व आरोग्य या अधीन राहून धर्मदाय हेतूने शैक्षणिक कार्यात सहभागी होता येते इतराप्रमाणे त्यांना घटनेने समान हक्क दिले आहेत असे ते म्हणाले.*

   *या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर हे* *उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले तर आभार श्री परमेश्वर कोळी सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री राजकुमार जाधव सर, श्री अगतराव मुळे सर, श्री सतीश कटके सर, श्री बालाजी हिप्परगे सर, श्रीमती प्रभावती बिराजदार मॅडम, श्रीमती मीनाक्षी हत्ते मॅडम, श्री कलशेट्टी पाटील, श्री मोहन साखरे आदींनी परिश्रम घेतले.*



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment