Saturday, 7 September 2019










मलंग विद्यालयांमध्ये सुरमय सकाळ

  आज दिनांक 7 सप्टेंबर 2019 रोजी विद्यालयामध्ये रोटरी क्लब उमरगा चे अध्यक्ष रोटेरियन प्राध्यापक डॉ. विनोद देवकर आणि रोटरी क्लब उमरगा चे सचिव प्राध्यापक युसुफ मुल्ला, तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील संगीत शिक्षक प्राध्यापक मुरलीधर जाधव यांच्या शुभ हस्ते श्रीच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.
     श्रीच्या पूजनानंतर विद्यालयामध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष  प्राध्यापक डॉ. विनोद देवकर  यांच्या अध्यक्षतेखाली सुरमय सकाळ भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
       यावेळी रोटरी क्लब उमरगा चे सचिव प्राध्यापक युसुफ मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर मंचावर विराजमान होते.
    मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यानंतर प्राध्यापक मुरलीधर जाधव यांनी सुरमय सकाळ या कार्यक्रमात भक्तीगीतांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी चिरंजीव शिंदे रितेश महादेव आणि कुमारी हलकट्टी आरती शिवकुमार या विद्यार्थ्यांनीही भक्ती गीताचे सादरीकरण केले.
  याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    विद्यालयातील सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.


Thursday, 5 September 2019













मलंग विद्यालयामध्ये शिक्षक दिनानिमित्त बोलताना  - डॉ. उदय मोरे 

आज दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये  उमरगा शहरातील प्रख्यात डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपा मोरे तसेच रोटेरीयन शिवानंद दळगडे माजी प्राचार्य आदर्श विद्यालय या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते विद्यालय मध्ये स्थापित पर्यावरण पूरक श्री च्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

त्यानंतर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सुरेखा ताई मलंग यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय मोरे डॉ. दीपा मोरे रोटे. शिवानंद दळगडे हे उपस्थित होते तर वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व्ही. के. पाटील हेमान्यवर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर व मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर हे मंचावर विराजमान होते.
    प्रमुख पाहुणे डॉ. उदय मोरे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु आई-वडील असून आपल्या जीवनाला आकार देणारे दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक हे आपल्यासाठी ईश्वरा समान असतात.
    भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केले पाहिजे असे मत डॉ. उदय मोरे यांनी व्यक्त केले.
   मलंग विद्यालयातील सहशिक्षक बालाजी हिप्परगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती विशद केली.
    तसेच याप्रसंगी डॉ. उदय मोरे आणि डॉ. दीपक मोरे यांनी आपल्या शुभहस्ते विद्यालयाला दोन वृक्ष भेट स्वरूपात प्रदान केले तर रोटे. शिवानंद दगडे  यांनी विद्यालयातील ग्रंथालयासाठी अकरा पुस्तकांची भेट सुपूर्द केली.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुरेखाताई मलंग यांच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या.
    सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Wednesday, 4 September 2019




🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा*

   *आज दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी मलंग विद्यालयामध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त श्रीची पूजा उमरगा नगरीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व सन्माननीय                     आकाश दादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.*
     *याप्रसंगी विद्यालयाचे  मुख्याध्यापक अजित गोबारे सर मुख्याध्यापक  कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*याप्रसंगी श्री गणेश उत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धा विद्यालय मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व सुंदरशा रांगोळ्या रेखाटल्या.*
🌹🌹🌷🌷🌹🌹

Monday, 2 September 2019

मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना 2019















मलंग विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

आज दिनांक 2 सप्टेंबर 2019 वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित, कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा आणि कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा या विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती ची स्थापना श्री व सौ मलंग यांच्या हस्ते करण्यात आली.

गणेशोत्सव म्हणजे एक प्रचंड उत्साह प्रचंड प्रसन्नता पण त्यामध्ये नकळतपणे निसर्गाची हानी होत असेल तर विचार करणे गरजेचे आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यासाठी विद्यालयांमध्ये कुठल्याही केमिकलचा वापर न करता  बनवलेली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग साहेब आणि वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ सुरेखा ताई मलंग यांच्या शुभहस्ते श्रीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
  तसेच विद्यालयातील जवळपास दोनशे ते अडीशे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपतीची निर्मिती केली आणि त्याच गणपतीची घरामध्ये स्थापना करण्याचे ठरविले.
आज मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या गणपती मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर जल प्रदूषण प्रदूषण होत असते तेव्हा या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे
गेल्या वर्षी म्हणजे 2018 पासून पर्यावरणपूरक गणपती स्थापना करण्याचा निश्चय विद्यालयाने केला आणि तोच निश्चय विद्यार्थ्यांमध्ये रुजविला.
आम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवून घरामध्ये याची स्थापना करत आहोत यामध्ये आम्हाला वेगळा आनंद मिळत आहे कारण यामुळे आम्हाला पर्यावरण संवर्धन यामध्ये सहभागी होता येत आहे असे मत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची पाहणी करताना वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम एस मलंग साहेब आणि सचिव सौ सुरेखाताई मलंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
   याप्रसंगी शालेय शिक्षण समिती मलंग विद्यालय उमरगा चे अध्यक्ष श्री एस. के. मलंग तसेच वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्ही. के. पाटील तसेच मुख्याध्यापक अजित गोबारे सर आणि मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.