Wednesday, 10 April 2019

महात्मा फुले जयंती 2019














🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा*

*आज दि. 11/04/2019 वार गुरुवार रोजी आमच्या मलंग विद्यालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात संपन्न. विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे  हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार स्वामी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर व इतिहास शिक्षक श्री सतीश कटके सर हे विराजमान होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना मार्गदर्शक श्री सतीश कटके सर म्हणाले की खऱ्या अर्थाने समाजातील अनिष्ट रूढींना विरोध करून मुक्तीचा मार्ग क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांनी तयार केला.*
     *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भक्ती शिवाजी शिंदे हिने केले तर आभार कुमारी विशाखा बाळकृष्ण शिंदे हिने मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment