मुख्याध्यापक कविराज रेड्डी सर यांची सचिवपदी निवड.
*उमरगा दि. 10/02/2022 वार गुरुवार नूकतीच महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खाजगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली ,त्यामध्ये कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज बजरंग रेड्डी सर यांची उस्मानाबाद जिल्हा सचिव म्हणून एकमताने निवड झाली. त्याबद्दल शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांसमोर निवड झाल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना ,श्री अजित गोबारे सर म्हणाले की, कविराज रेड्डी सर यांची प्रशासनामध्ये काम करून घेण्याची आगळी-वेगळी पद्धत व शाळा चालवीत असताना उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य व इतर कर्मचाऱ्यांमधून अतिशय सहकार्याचे संबंध आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व या गुणांचा विचार करून उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीने एका आदर्श व्यक्तीचा सचिवपदी निवड करून चांगल्या व्यक्तिमत्वाला पुढील कार्य करण्याची सुवर्ण संधी दिली आहे याचा रेड्डी सर निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करतील यात शंकाच नाही.*
*या सत्काराला उत्तर देताना श्री कविराज रेड्डी सर म्हणाले की ,मला हे पद मिळण्यामागे वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचा आशीर्वाद आहे तसेच तुम्हा सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी राहिल्या आहेत, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कार्यकारिणीने माझ्यावरती विश्वास ठेवुन हे पद मला दिले याची मला कायम जाणीव राहणार आहे यापुढेही कार्य करीत असताना मी माझे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य देणार आहे तुम्ही माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीचा खूप मोठा सत्कार केला त्याबद्दल मी कायमस्वरूपी आपल्या र ऋणांमध्ये राहणार आहे.*
*या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शरणप्पा मलंग विद्यालयातील व कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार यांनी केले व आभार मानले.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹