Saturday, 11 January 2020

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला



📚📓📚📘📚📗📚📘

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मलंग विद्यालयाची भेट.*

  *दिनांक 11/01/2020 वार शनिवार रोजी मलंग विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली. इयत्ता दहावी मराठी अभ्यासक्रमातील कविता "आश्वासक चित्र" कवयित्री- 'नीरजा' यांच्याशी अभ्यासक्रमातील कविते विषयी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले साहित्यिक - नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी, कवियित्री अशा अनेक नामवंत साहित्यिकांशी मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संवाद साधला तसेच कथा-कथन, कवीकट्टा, नाटक, परिसंवाद इत्यादी साहित्य संमेलनामध्ये सादरीकरण झालेल्या अनेक कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंद घेतला.विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर तसेच मराठी विभाग प्रमुख - श्री अगतराव मुळे सर, मराठी शिक्षक - बालाजी हिप्परगे सर, राजकुमार जाधव सर, श्रीम.स्वाती उटगे मॅडम यांनीही मराठी साहित्य संमेलनाचा आनंद घेतला.*

📚📚📚📚📚📚📚📚
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Saturday, 4 January 2020

स्वयंशासन दिन साजरा




🌹👩‍🏫🌹👨‍🏫🌹👩‍🏫🌹👨‍🏫🌹

*कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये स्वयंशासन दिन साजरा.*
 
      *दि. 03 जानेवारी 2020 वार शुक्रवार सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यालयांमध्ये स्वयंशासन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. एक दिवस संपूर्ण शाळा चालविण्याची जबाबदारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली या मागचा हेतू असा होता की विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकांविषयी चे खूप आकर्षण असते व आदर असतो आपणही एक दिवस शिक्षक व्हावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते पण भविष्यामध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवून मलंग विद्यालयाने अतिशय उत्साहाने स्वयंशासन दिन साजरा केला.*
   *इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. तनवी रणजीत बिराजदार प्रथम सत्रामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक होण्याचा मान देण्यात आला तर मराठी माध्यमातून सर्व प्रथम आलेल्या कु. भारती दामशेट्टी या मुली उपमुख्याध्यापक पदावरती संधी देण्यात आली. मराठी विभागप्रमुख श्री अगतराव मुळे सर यांच्या निरीक्षणाखाली इंग्रजी माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय तर मराठी माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय असा उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमांमध्ये कु.भारती दामशेट्टी या विद्यार्थिनीने इयत्ता नववी वर्गासाठी इंग्रजी विषयाची उत्कृष्ट अध्यापन केले तिला उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले तर इंग्रजी माध्यमातून कु. श्रुती राजेंद्र कोगनुरे उत्कृष्ट अध्यापन केले त्याबद्दल आदर्श शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली.*
   *या स्वयंशासन दिनानिमित्त एकंदरीत 150 विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिका म्हणून सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचे उत्कृष्ट अध्यापन केले. यामध्ये मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर यांनी उत्कृष्ट नियोजन करून दिले व सर्व शिक्षकांनी आपापल्या विषयाची संबंधित विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मी शिक्षक कसा झालो. आपले अनुभव विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद याविषयी आपापली मते मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख श्री राजकुमार जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती शिंदे यांनी केले या विद्यार्थिनीने केले व आभार मानले.*

👩‍🏫🌹👨‍🏫🌹👩‍🏫🌹👨‍🏫🌹👩‍🏫