Thursday, 1 August 2019


मलंग विद्यालयतील विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईड कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने सत्कार 

    दि. 30/07/2019
वार मंळवार रोजी स्काऊट गाईड कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आआला. नॅशनल इंटिग्रेटेड कॅम्प हरियाणा दि.4 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2018 या कॅम्पमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्र राज्याची संस्कृतीचे दर्शन वेगवेगळ्या पथनाट्यातून संपूर्ण भारताला करून दिले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख येथे आलेल्या एकूण 24 राज्यातील शाळांना व विद्यार्थ्यांना करून दिले  याबद्दल स्काऊट गाईड कार्यालय उस्मानाबाद जिल्हा मंडळ वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये उस्मानाबाद स्काऊट गाईड  कार्यालयचे आयुक्त श्री शिवाजी चंदनशिवे साहेब  यांच्या हस्ते मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर तसेच स्काऊट गाईड विभाग प्रमुख श्री परमेश्वर कोळी सर स्काऊट विद्यार्थी कृष्णा कुंभार, प्रसाद अचलेरे, साहिल मुल्ला, समर्थ कडुंबले, केदार कुभांर, विवेक बिराजदार, अभय बिराजदार, प्रबुद्ध बेळंबकर सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

31/07/2019