Tuesday, 19 February 2019

कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

उमरगा दि. 19/02/2019 वार मंगळवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सुकत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व प्रमुख पाहुणे म्हणून कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर उपस्थित होते.
 यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या भाषणातून केला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ नाव न घेता त्यांनी अंगिकारलेल्या स्वराज्याची कल्पना प्रत्यक्ष आचरणात उतरवली तर भारताला महासत्ता होण्यास काही वेळ लागणार नाही. पण आज पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढत्या पगड्यामुळे तरुण भरकटला जात असून त्याचेच परिणाम आज समाजात दिसू लागले आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
     श्री छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये ढोल पथकाच्या गर्जनेत मिरवणुकीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उमरगा येथील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री अजित गोबारे सर यांच्या पुष्पहार घालण्यात आले.  विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा देखावा सादर केला शाळेचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर आणि शाळेतील श्री राजकुमार जाधव सर, श्री सतीश कटके सर,श्री विवेकानंद पाचंगे सर, श्री बालाजी हिप्परगे सर, श्री परमेश्वर सुतार सर, श्री परमेश्वर कोळी सर, सौ. प्रभावती बिराजदार, सौ. मीनाक्षी हत्ते, श्री कलशेट्टी पाटील सर, श्री मोहन साखरे सर व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी केले तर आभार श्री सतीश कटके सर यांनी मानले.







Monday, 18 February 2019






💐💐💐💐💐💐
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

भावपूर्ण श्रद्धांजली

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी संघटनेने केलेल्या  भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 हून जास्त जवान हुतात्मा झाले या वीर जवानांना, शरणप्पा मलंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह,मलंग विद्यालय उमरगा-महादेव मंदिर रोड- इंदिरा चौक-हायवे नंबर 9- शिवाजी चौक ,उमरगा Candle मार्च काढून शिवाजी चौक येथे दोन मिनिटे मौन बाळगून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Friday, 15 February 2019








💐🌷💐🌷💐🌷💐 
कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा

आज दि. 15/02/2019 वार - शुक्रवार रोजी
आमच्या मलंग विद्यालयामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक राजकुमार जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री आगतरावराव मुळे सर उपस्थित होते.
           स.शि. परमेश्वर सुतार यांनी संत सेवालाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ते म्हणाले की, सौतार वळख सौता करलो हा मंत्र संत सेवालाल यांनी सर्व समाजबांधवांना दिला आणि परिवर्तनाचा पाया रचला.अशिक्षित असूनही आपल्या विचारी वृत्तीने त्यांनी त्या काळात अंधश्रद्देस विरोध दर्शविला.तेंव्हा अश्या थोर समाजसुधारकाच्या जीवनातून धडे घेऊन आजच्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे असे मत सुतार सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री विवेकानंद पाचंगे सर यांनी केले तर आभार श्री बालाजी हिप्परगे सर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री सतीश कटके सर श्री परमेश्वर कोळी सर श्रीमती प्रभावती बिराजदार श्रीमती मीनाक्षी हत्ते श्री कलशेट्टी पाटील श्री मोहन साखरे श्री दुष्यंत कांबळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🌷🚩🌷🚩🌷🚩🌷