Friday, 31 August 2018

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मन शांती तुमच्या जीवनात घडेल मोठे क्रांती आणि होईल तुमची जीवनाची प्रगती - असे राजयोगीनी ब्राह्मकुमारी अनिता बहनजी म्हणाल्या.


*वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.शरणप्पा मलंग मलंग विद्यालय उमरगा* आणि कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला *अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सुरेखाताई मलंग* या लाभल्या होत्या व *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एस. मलंग साहेब* तर प्रमुख पाहुणे म्हणून *शिल्पा बहनजी, डॉ.पुरी सर, प्रा. सूर्यवंशी सर, हंसाबी बहन, राजू भैय्या, स्वामी मॅडम व अंजली शिंदे* विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* व कुमारस्वामी प्रा. वि. चे *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना बहनजी म्हणाल्या मुलांनो तुमचा बालपणीचा काळ खूप सुखाचा आहे. कारण तुमच्या मुठीमध्ये तुमचे भविष्याचे यश दडले आहे. तुम्ही कोणतेही प्रयत्न केला तर ते जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवून देतील म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मनशांती त्यानंतर महत्वाचे आहे तुमच्यातला आत्मविश्वास. आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते. आत्मविश्वासाने तुम्ही हाताने दगडही फोडू शकता. कितीही अपयश आले तरी प्रयत्नाचा मार्ग सोडू नका. स्वतचा स्वतःला स्वाभिमान असला पाहिजे. स्वतःची पाठ स्वतःच थापटून घ्या. जेवढे मोठे व्हाल तेवढी नम्र व्हा जेव्हा हाताची पाच बोटे मी मोठा मी मोठा म्हणून वाद करतात तेव्हा कोणतेही यश ते संपादन करू शकत नाहीत. पण जेव्हा एकत्र येऊन मोठ आवळतात तेव्हा केलेला संकल्प सिद्धीस जातो. तुमचे लक्ष अर्जुनासारखे असावे तुमचे यश सचिन तेंडुलकरासारखे असावे. संयम मात्र महेंद्रसिंग धोनी सारखा असावा. नरेंद्र मोदीच्या पावला वरती पाऊल ठेवून चालला तर तुम्हीही एक दिवस देशाचे पंतप्रधान होऊ शकता अशा त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर* यांनी केले तर कार्यक्रमाचे *आभार श्री बालाजी हिप्परगे सर* यांनी यांनी मांडले. हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी *श्री राजकुमार जाधव, श्री आनंदराव मुळे, श्री सतीश कटके, श्री विवेकानंद पाचंगे, श्री परमेश्वर कोळी, श्रीमती बिराजदार मॅडम श्रीमती हत्ते मॅडम, साखरे सर* आदींनी परिश्रम घेतले.

🌸💐🌸💐🌸💐🌸

Tuesday, 14 August 2018

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*कै.शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा*

*आज दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी विद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये संपन्न*.

कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री व्ही. के. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

या कार्यक्रमाला  *वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आद.डॉ.एम.एस.मलंग साहेब,* शालेय शिक्षण समितीचे *अध्यक्ष श्री एस. के. मलंग* ,संस्थेचे सहसचिव *श्री एस. के. व्हडरे** इतर पदाधिकारी *श्री अप्पासाहेब हत्ते,*  *श्री संतोष करपे,* *श्री शिवराज बमचंडे* आणि विद्यालयाचे *मुख्याध्यापक अजित गोबारे सर* कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर *मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर* दोन्ही विद्यालयाचे सर्व शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्रीमती जाधव मॅडम* यांनी केले तर आभार *श्री हत्तर्गे सर* यांनी मानले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


Monday, 6 August 2018

विद्यार्थ्यांचे यश

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*तालुकास्तरीय विज्ञान  वक्तृत्व, योगा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मलंग विद्यालयाचे यश*

राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर,गटशिक्षण कार्यालय उमरगा व कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान वकृत्व स्पर्धेचे आयोजन दि. 04/08/2018 वार शनिवार रोजी कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तथा अध्यक्ष शालेय शिक्षण समिती कै शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा चे *श्री एस. के. मलंग साहेब*, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक *श्री अजित गोबारे सर* उपस्थित होते.
औद्योगिक क्रांती: आपण तयार आहोत काय ? हा या स्पर्धेचा विषय असून या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी *चि. शिंदे रितेश महादेव* हा तालुक्यातून *सर्वप्रथम* आला असून जिल्हास्तरावर याची निवड झाली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आमच्या विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर* यांनी प्रेरणा दिली असून या स्पर्धेसाठी विज्ञान शिक्षक *श्री व्हि.बी.पाचंगे सर* व *श्री पी. आर. सुतार सर* यांनी मार्गदर्शन केले. तसेच चालू असलेल्या पावसाळी क्रीडा योगा स्पर्धेमध्ये दिव्यता चंद्रास काजळे,समर्थ संजय कडुंबले व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दीक्षा दगडू आगलावे या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय निवड झाली. यशस्वीतेसाठी *श्री आर. बी. जाधव सर*, *श्री एल मुळे सर*, *श्री एस, एस, कटके,* *श्री बी आर हिप्परगे सर,*  *श्रीम. पी. एन. बिराजदार*, *श्रीम. एम. एस. हत्ते*  *श्री पी. आर. कोळी सर* यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
💐🎯💐🎯💐🎯💐